शेवगांव पाथर्डी विधासभा निवडणुक निकालाची उत्सुकता शिगेला मातब्बर उमेदवाराच्या समर्थकांची मिश्यांवर ताव देऊंन देऊंन विजयाची आकडेवारी

222 शेवगांव पाथर्डी विधासभा निवडणुक निकालाची उत्सुकता शिगेला मातब्बर उमेदवाराच्या समर्थकांची मिश्यांवर ताव देऊंन देऊंन विजयाची आकडेवारी

{अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
या बाबत सविस्तर वृत्त असे की 20 तारखेला पार पडले परंतु अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आपलाच नेता कसा विजयी होईल जाती पतीचे आणि पाठिंब्याचे गणित मांडून विविध गावातील कमी जास्त झालेली आकडेवारी निवडणुकीच्या आधल्या रात्री झालेल्या कुरघोड्या शेवगांव आणि पाथर्डी शहरातील कमी झालेली मतदानाची टक्केवारी शेवगांव च्या तुलनेत पाथर्डी तालुक्यात कमी झालेले मतदान कोणाला तारक आणि कोणाला मारक यावर चर्चा झडू लागल्या आहेत मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे शेवगाव पाथर्डी मतदारसंघात एकूण मतदार 374645 पैकी ६९.३६ टक्के मतदान झाले पुरुष : १३७६१३ स्री : १२२१०५
इतर : ४ एकुण अंतिम झालेले मतदान २५९७२२
एकूण मतदान झालेले मतदान - २,५९,७२२ शेवगाव तालुक्यात झालेले एकूण मतदान -१,५०,४८४ पाथर्डी तालुक्यात झालेले एकूण मतदान -१,०,९२३८मतदानाची टक्केवारी 69% राहिली आहे शेवगांव तालुक्यातील ठरवणार पुढील आमदार कोण परंतु कट्टर समर्थक आपलाच उमेदवार लाखापेक्षा जास्त मते घेणार असा दावा करत आहेत काही याला त्याला फोन करून खाचाखोचा जाणून घेत आहेत परंतु काहींनी जिरवा जिरवीच्या राजकारणात आपलं राजकीय करियर दाव्याला लावलं आहे आपल्या मनासारखं झालं तर ठीक नाहीं तर काहींवर पार मिश्या भादरायची वेळ येणार आहे *काहींनी ऐन अडचणीच्या काळात आपल्या नेत्याची साथ सोडल्याने त्या नेत्याच्या सोयीचा निकाल नाहीं लागला तर नेता आपल्याला पॉम्पलेट वाटायला सुद्धा ठेवणार नाहीं याची धास्ती पडली आहे



काहींनी भूमिका आपला नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे अशी भूमिका घेतली होती सरकार कोणाचेही आलें तरी पुढील वर्ष हे निवडणुकांचे असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद पंचायत समिती जिल्हापरिशद ग्रामपंचायत यांच्या तुंबलेल्या निवडणुका येऊ घातल्या आहेत काहींनी विधानसभेला परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी चपलांचा नवीन जोड तर ग्यावा लागणार नाहीं ना अशी अवस्था झाली आहे
 

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी