स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमीत स्वातंत्र्य सैनिकांना मोफत आरोग्य सेवा - डॉ जितीन वंजारे

बीड प्रतिनिधी- नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील सामाजिक वैद्यकीय व राजकीय क्षेत्रातील उतूंग व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी एक नवीन स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमीमध्ये म्हणजेच पिंपळनेर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी सर्व रुग्णांसाठी सूख-सोयी उपयुक्त हॉस्पिटल आणि स्वातंत्र्य सैनिकांसाठी मोफत आरोग्य सेवा अविरतपणे देण्यासाठी हॉस्पिटल निर्माण केले आहे या हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या वीर पत्नी यांना अविरतपणे मोफत आरोग्य सेवा देण्याचे डॉक्टर जितीन वंजारे यांनी ठरवले आहे. स्वातंत्र्यसैनिक कै.सुखदेव जायभाये यांच्या स्मतीप्रित्यर्थ मौजे पिंपळनेर या ठिकाणी भाऊ बाबा मंदिरा पाठी, इंदूवासिनीदेवी रोडलगत भव्य दिव्य अशा पद्धतीचे सर्व सुविधा उपलब्ध असणारे हॉस्पिटल डॉक्टर जितीन वंजारे आणि नवनाथ जायभाये यांनी चालू केले असून या हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना व त्यांच्या वीर पत्नी यांना मोफत आरोग्य सेवा पुर...