गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदान प्रक्रिया शांततेत पार

 गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे :-
३४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; ९३ टक्के मतदान 
पंडित - पवारांची प्रतिष्ठा पणाला; भर पावसात राजकीय मंडळी ठाण मांडून 

गेवराई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची शुक्रवार दि.२८ एप्रिल २०२३ रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली. १७ जागेसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जिल्हा परिषद मा.कन्या शाळा, गेवराई येथे सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत एकुण ९३ टक्के मतदान होवून ३४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. दरम्यान यावेळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र दोन्ही गटातील राजकीय मंडळी मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. 

सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राजकीय पातळीवर विचार केला तर सत्ताधारी व विरोधकांची प्रतिष्ठा पणाला लागली. सत्ताधारी गटाचे प्रमुख माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात सत्तांतरासाठी भाजपचे आमदार लक्ष्मण पवार व शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री बदामराव पंडीत यांनी युती करुन शेतकरी विकास आघाडी करत कंबर कसली दरम्यान शुक्रवारी गेवराई येथे सात मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली असून एकुण २७३६ मतदानापैकी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत २५४५ मतदान होवून एकुण ९३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एस.एस.कदम यांनी दिली. सात मतदान केंद्रावर ६७ कर्मचारी यांनी निवडणूकीच्या यशस्वीतेसाठी कामकाज पाहिले. दरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर, पो.कॉ.पारधी, पो.कॉ.कदम, पो.कॉ.वायभसे, पो.कॉ आघाव, म.पो.वैशाली राठोड सह पोलीस कर्मचारी यांच्याकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता..
गेवराई पंचायत समितीत आज मतमोजणी
   
गेवराई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची आज शनिवार दि.२९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गेवराई पंचायत समितीत ८ टेबलवर मतमोजणी होवून निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एस.एस.कदम यांनी दैनिक लोकाशाशी बोलताना दिली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी