मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्त प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीचा कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी आज शुक्रवारी प्रत्यक्ष आढावा घेतला.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते होणाऱ्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्त प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीचा कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी आज शुक्रवारी प्रत्यक्ष आढावा घेतला.
सोयगाव ( प्रतिनिधी यासीन बेग )
मंत्री विखे पाटील यांचे सोयगाव येथे हेलिकॉप्टर ने आगमन होणार आहे. त्याअनुषंगाने यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे करण्यात आलेल्या हेलिपॅडची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भूमिपूजन स्थळ व येथे करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. रविवार रोजी होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्या निमित्त प्रभावी नियोजन करावे अशा सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी तहसीलदार रमेश जसवंत, एपीआय अनमोल केदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नितीन राठोड, वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता अभिजित गौर, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, शिवसेना शहरप्रमुख संतोष बोडखे, नगर पंचायत शिवसेना गटनेता अक्षय काळे, संजय आगे, दिलीप देसाई आदींची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment