आरटीई प्रवेशात बोगसगिरी ; खोटे भाडेपत्र, आधार आणि बँक पासबुक पालकांकडून सादर

आरटीई प्रवेशात बोगसगिरी ; खोटे भाडेपत्र, आधार आणि बँक पासबुक पालकांकडून सादर

बोगस प्रवेश रोखण्याची शिवसंग्राम कडून मागणी

पडताळणी समिती कडून बोगस प्रवेशाला पाठबळ
बीड (प्रतिनिधी) आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी लॉटरी द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गटशिक्षाधिकारी कार्यालयात पडताळणी समिती कडून कागदपत्रांची पडताळणी झाल्या नंतरच प्रवेश निश्चित होतात यासाठी सध्या जिल्ह्यात निवड झालेल्या १ हजार ८२१ विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोफत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना रहीवासी पुरावा सादर करावा लागतो यात बहुतांश पालकांनी खोटे भाडेपत्र, आधार कार्ड आणि बँक पासबुक रहिवासी पुरावा म्हणून सादर केले आहेत त्यांची पडताळणी समिती द्वारे प्रत्यक्ष भेट देवून पालक त्याठिकाणी राहतात की नाही याची तपासणी करावी आणि ऑनलाईन अर्ज दाखल केल्या नंतरचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्या पालकांच्या पाल्याचे प्रवेश रद्द करावा या बाबत आज शिवसंग्रामच्या वतीने निवेदन देण्यात आले.

             आरटीई नुसार समाजातील गोर - गरीब विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा हा हेतू आहे. परंतु आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळावा यासाठी सदन पालकांनी देखील आपल्या पाल्याचे अर्ज दाखल केले आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्याच्या पालकांचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरलं जातो मात्र यात अर्ध्या हून अधिक पालकांनी रहिवासी पुरावा म्हणून खोटे बँक पासबुक, भाडेपत्र आणि आधार कार्ड दिले आहेत. यावर पडताळणी समिती फक्त कर्यालातच फॅनची हवा घेत कागदपत्रे तपासत आहेत आणि बोगस प्रवेशाला वाव देत आहेत. यामुळे या योजनेत शाळे जवळ राहणारे खरे लाभधारक विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहत आहेत. तेव्हा शासनाने पडताळणी समितीला नेमून दिलेल्या नियमा नुसार पडताळणी समितीने प्रत्यक्ष पालकांनी दिलेल्या रहीवासी पुराव्यांवर पालक राहतात का नाही याची खात्री करूनच प्रवेश द्यावेत तसेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे अर्ज दाखल केलेल्या तरखे पूर्वीचे ग्रहीत धरण्यात यावे आणि अश्या पालकांच्या पाल्यांचा प्रवेश करू नयेत. जेणे करून बोगस प्रवेशाला आळा बसेल आणि खरे गोर - गरीब विद्यार्थी या प्रवेशासाठी पात्र ठरतील तरी. सर्व तालुक्यातील पडताळणी समितीला योग्य ते निर्देश द्यावेत ही विनंती शिवसंग्रामच्या वतीने निवेदनात शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी शिक्षण आयुक्त,शिक्षण संचालक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना करण्यात आली. यावेळी सुहास पाटील, शिवसंग्रामचे शहर अध्यक्ष राहुल मस्के, शहर उपाअध्यक्ष शेषेराव तांबे, मा. नगर सेवक दत्ता गायकवाड, शैलेश सुरवसे, मा. सरपंच राहुल हजारे, साथीराम ढोले, अझर शेख, लाला भाई आदी उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी