कन्हेरवाडी येथील आनंद नगर येथे 27 एप्रिल रोजी भीम जयंती अत्यंत थाटामाटात साजरी
कन्हेरवाडी येथील आनंद नगर येथे 27 एप्रिल रोजी भीम जयंती अत्यंत थाटामाटात साजरी
जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी मानले आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आभार
परळी प्रतिनिधी-
कन्हेरवाडी येथील आनंदनगर येथे 27 एप्रिल रोजी भीम जयंती उस्ताहात आणि अत्यंत आनंदात साजरी करण्यात आली होती यावेळी असंख्य कार्यकर्ते व गावातील नागरिक आवर्जून उपस्थित राहिलेले होते.परमपूज्य,विश्वरत्न,बोधिसत्व,महामानव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती अत्यंत धूम धडाक्यात साजरी करण्यात आली आहे. तालुक्यातील अत्यंत नावाजलेले गाव असलेले कन्हेरवाडी येथील यावर्षी नव्याने सुरुवात केलेली भीम जयंती अत्यंत आकर्षणाचा व मोलाचा विषय ठरली होती कारण सर्व समजातील युवकांनी आणि नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन जयंती ही एकट्या समाजाची नसून सर्वांची आहे या भावनेतून सर्वांनी पुढाकार घेऊन करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पेन,वही,ट्रॉफी यांचे वितरण व सत्कार करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे ध्वजारोहण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते मा.श्री.माणिक भाऊ यांच्या हस्ते करण्यात आले आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून भगवानदादा फड, सतीश भगवानराव फड, ,विकास दादा मुंडे,दिल्ली पोलीस शिवाजी फड,वंचित बहुजन आघाडीचे महासचिव मिलिंद घाडगे, बालासाहेब जगतकर,प्रसेंजीत रोडे, मुख्याध्यापक कानेरे सर ,ग्रा.पं. सदस्य समाधान मुंडे, रा.कॉ.पा.चे ज्येष्ठ नेते अंबादास दादा रोडे, हनुमंत दादा फड,आदी मान्यवर उपस्थित होते.
जयंती उस्तव कमिटीचे अध्यक्ष -महादेव वाघमारे ,उपाध्यक्ष -सोमनाथ फड,कोषाध्यक्ष-संभाजी सातपुते,
देविदास रोडे,संग्राम रोडे,बेगराज रोडे,रवी रोडे,धनराज रोडे,शितलकुमार रोडे,नागेश रोडे, मंगेश रोडे,सतीश रोडे,खंडू हानवते,भैय्यासाहेब गवळी आदींची उपस्थिती होती..
Comments
Post a Comment