१ मे जागतिक कामगार दिनी मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर द्वार सभेचे आयोजन - भाई गौतम आगळे
परळी वैजनाथ, दि.२९ ( प्रतिनिधी ) एक मे जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून रोजंदारी मजदुर सेनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर द्वार सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिली आहे.
या द्वार सभेत सफाई कामगारां सहित इतर कंत्राटी कामगारांच्या मुलभूत हक्क, अधिकार व त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर अॅड. अजय गंडले मार्गदर्शन करणार आहेत. सफाई कामगारां सहित इतर कंत्राटी कामगारांना शासनाने निश्चित केलेले किमान वेतन व सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक ०९ मे २०२३ मंगळवारी सकाळी ११ वा. साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे, चौक औरंगाबाद / छत्रपती संभाजी नगर येथे संघटनेच्या बॅनरखाली चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याचे नियोजन सुध्दा करण्यात येणार आहे. या द्वार सभेला बीड जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर, मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड, बीड जिल्हा अध्यक्षा अनिता बचुटे, जिल्हा कार्य अध्यक्ष भाई लक्षीमन सोनवणे, जिल्हा सचिव पंचशिला क्षिणगारे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment