श्रीमती. सुवर्णलता गायकवाड यांना माजी सहकार मंत्री मा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मानित

 

शिरूर: शिरूरमधील कवयित्री श्रीमती. सुवर्णलता पांडूरंग गायकवाड यांना अहमदनगर जिल्ह्यातील राहता या ठिकाणी दि २३ एप्रिल २०२३ रोजी काव्यलेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांकाने माजी सहकार मंत्री मा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेखणी ता श्रीगोंदा जि. अहमदनगर येथे कार्यरत आहेत.

दि २३.०४.२०२३ रोजी राहता जि अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हा शिक्षक सहकारी बँकेचा शताब्दी महोत्सव व कृतज्ञता सन्मान सोहळा २०२३ संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील काही कवयित्रींना काव्यलेखन स्पर्धेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मंचावर सहकार मंत्री मा अतुलजी सावे, पालकमंत्री मा राधाकृष्ण विखे पाटील, माजी सहकार मंत्री मा हर्षवर्धन पाटील उपस्थित होते 

महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक संघ, शाखा अहमदनगर , गुरुमाऊली मंडळ व जिल्हा कला साहित्य संघ व जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने दि ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय महिला काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेत श्रीमती. सुवर्णलता पांडूरंग गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेखणी ता.श्रीगोंदा यांना उत्तेजनार्थ क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. काव्यलेखन स्पर्धेचे परीक्षण येवला जि नाशिक येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रशांत वाघ यांनी केले होते. 

यावेळी कला साहित्य शिक्षक संघ व अहमदनगर जिल्हा शिक्षक बॅंकचे संचालक मा कारभारी बाबर, ओंकार प्रॉडक्शन, निर्माता दिग्दर्शक मा राजेंद्र पोटे प्राथ. शिक्षक , मा. अशोक कळमकर , मा बाळासाहेब बोरुडे, कार्यालयीन चिटणीस शिक्षक संघ , पारनेरचे मा अनिल इकड ,गोकुळ कळमकर मा.बापूसाहेब तांबे

यावेळी अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे सर्व पदाधिकारी, तसेच मा संजयजी पठाडे, मा कारभारी बाबर, मा गणेशजी भोसले, मंजुश्री वाळुंज,उज्वला जाधव,शुभांगी सोनावणे,सौ.सुजाता रासकर ,गीतांजली वाबळे,जया कुलथे,अशोक गायकवाड,अशोक पवार,आगळे नाना,मा.रादास पुजारी साहेब,दत्तात्रय खामकर,रामदास लोंढे,संजय बोरूडे,बाळासाहेब शिंगोटे,सतिष शेटे सर,पारनेर साहित्य साधना मंच समुहाचे सर्व सदस्य, आदींनी अभिनंदन केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी