नऊ वर्षाच्या सय्यद आरिफ़ ने पूर्ण केले रमज़ानचे कमाल रोज़े,लहान रोज़ेदार यातून प्रेरणा घेतील - एस.एम.युसूफ़

नऊ वर्षाच्या सय्यद आरिफ़ ने पूर्ण केले रमज़ानचे कमाल रोज़े,लहान रोज़ेदार यातून प्रेरणा घेतील - एस.एम.युसूफ़
 
बीड (प्रतिनिधी) - नुकतीच २२ एप्रिल रोजी इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र अशी रमजान ईद जगभरात साजरी करण्यात आली. यावर्षीही रमज़ान महिना जीवाची लाहीलाही करणाऱ्या कडक उन्हाळ्यात आल्याने रोजेदारांच्या सहनशक्तीचा चांगलाच कस लागला. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शहरातील आसेफ़नगर भागात राहणारे सय्यद कौसर नदीम यांचा जेमतेम साडेनऊ वर्षाचा मुलगा व महावितरण कंपनी चे सेवानिवृत्त दिवंगत अभियंता सय्यद सरफ़राज़ अहेमद यांचा नातू सय्यद आरिफ़ याने रमज़ान महिन्याचे एक-दोन नव्हे तर २९ मधून चक्क २६ रोज़े धरून अत्यंत कमी वयात कमाल रोज़े धरणारा रोज़ेदार ठरला. उर्वरित तीन रोज़े ही तो पूर्ण करू शकला असता परंतु आजारी पडल्याने त्याला तीन रोजे धरता आले नाही. याची खंत ही या बालरोज़ेदाराने बोलून दाखवली. यामुळे एस.एम.न्युज़चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ आणि कार्यकारी संपादक शेख वासेख़ यांनी त्यांच्या घरी जाऊन आरिफ़ यास शाल व पुष्पगुच्छ देऊन हृदयी अभिनंदन केले. यावेळी आरिफ़ चे नाना सय्यद अब्दुल हमीद, वडील सय्यद कौसर नदीम, सय्यद इक्बाल आणि इंजि. सय्यद ताहा हे दोन्ही काका उपस्थित होते. आरिफ़ ने अशाच प्रकारे दरवर्षी रमज़ान महिन्याचे पूर्ण रोज़े धरावे अशा शुभकामना व्यक्त केल्या. शिवाय दरवर्षी रमज़ान महिन्यात लहान मुले-मुली पहिला रोज़ा पूर्ण केल्यानंतर अशा लहान रोज़ेदारांचे फोटो आणि बातम्या प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित करण्यात येतात. असे लहान रोज़ेदार आरिफ़ कडून प्रेरणा घेऊन रमज़ान महिन्यात जास्तीत जास्त रोज़े धरतील अशी अपेक्षा ही व्यक्त केली.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी