अवकाळी पावसामुळे चौसाळा अंजनवती लिंबागणेश नेकनूर या भागात जनावरांच्या चाऱ्याची अडचण भासणार
अवकाळी पावसामुळे चौसाळा अंजनवती लिंबागणेश नेकनूर या भागात जनावरांच्या चाऱ्याची अडचण भासणार-माजी सैनिक आशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड
शेतकऱ्यांच्या जनावरांना यावर्षी अवकाळी पावसामुळे चाऱ्याची अडचण भासणार जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार
बीड प्रतिनिधी -बीड तालुक्यामध्ये चौसाळा लिंबागणेश अंजनवती मोरगाव नेकनूर बालाघाट या भागामध्ये सर्व मोठ्या प्रमाणात जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारीची पेरणी केली जाते यावर्षी ही पेरणी लांबल्यामुळे ज्वारीचे पीक देखील लांबणीवर पडले आणि ज्वारी शेतामध्ये उभी असताना वाऱ्याने गारपिटीने ज्वारीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचबरोबर वर्षभर जनावरांसाठी चारा एकत्र केला जातो त्यामध्ये मुख्य चारा म्हणून ज्वारीचे गुड, कडबा, म्हणजे वैरणची साठवणूक केली जाते परंतु यावर्षी अवकाळी पावसामुळे या वैरणीचे भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी याकडे प्रशासनाचे कसलेही लक्ष नाही येणाऱ्या काळामध्ये जर पाऊस लांबला किंवा व्यवस्थित झाला नाही तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहू शकतो शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम आदमी पार्टी बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार
Comments
Post a Comment