फुले पिंपळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता सैनिक दलाची मानवंदना
बीड प्रतिनिधी - दि.28 फुले पिंपळगाव ता.माजलगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर 132 वी जयंती निमित्त बीड समता सैनिक दलाची वतीने मानवंदना देण्यात अली.
सर्वप्रथम तथागत महात्मा गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले व सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व आंबेडकर प्रेमी महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी कॅप्टन राजाभाऊ आठवले,अमरसिंह ढाका व महिला समता सैनिक,युवक समता सैनिक यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावातील नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment