भारताच्या घटनाकारांची 132 वी सार्वजनिक नागरि स्वरूपाची जयंती साजरी करून कौडगाव करांनी दिला महाराष्ट्राला सामाजिक समतेचा संदेश
भारताच्या घटनाकारांची 132 वी सार्वजनिक नागरि स्वरूपाची जयंती साजरी करून कौडगाव करांनी दिला महाराष्ट्राला सामाजिक समतेचा संदेश
मिरवणुकीत संपूर्ण गाव झाला सामील होऊन जयंती उत्सव पडला पार-युवा जनशक्ती ग्रुपच्या माध्यमातून हजारो लोकांच्या जेवणाची केली सोय.
केज/प्रतिनिधी:-
सामाजिक समतेचे महानायक ज्ञानयोगी परिवर्तनाचा अग्रदूत सामाजिक समतेचा महानायक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 सार्वजनिक जन्मोत्सव हा हजारो लोकांनी जगामध्ये साजरा केला व महामानवाचा जन्मोत्सव जगामध्ये प्रचंड उत्साहात साजरा झाला जसा जगामध्ये हा उत्सव प्रचंड उत्साहामध्ये साजरा झाला या सगळ्याला अपवादात्मक महामानवाचा जन्मोत्सव हा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये केज तालुक्यातील कौडगाव ह्या गावामध्ये संपूर्ण गावाने मिळून साजरा केलेल्या जन्मोत्सवाचं एक वेगळेपण यावर्षी पाहायला मिळालं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 132 वा सार्वजनिक नागरी स्वरूपाचा जन्मोत्सव हा दोन दिवसीय साजरा करण्यात आला पहिल्या दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार असलेल्या विचारवंत यांचे प्रबोधनपर व्याख्यान आणि दुसऱ्या दिवशी 27 एप्रिल 2023 रोजी महामानवाच्या प्रतिमेची मिरवणूक ही संपूर्ण गावाने दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावातील सर्व गावकऱ्यांनी मिळून काढली व प्रचंड उत्साह मध्ये साजरी केली सदरील कार्यक्रमाच्या वेळी पंचक्रोशीतील हजारो लोक उपस्थित होते लेझीम पथकांसह असंख्य पंचक्रोशीतील उपस्थित समुहांनी आपली कलाकृती गाण्यांच्या तालावर सादर केल्या. महापुरुषांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीची सांगता ही संपूर्ण गावाच्या उपस्थितीमध्ये सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन मिरवणूक विसर्जित करण्यात आली.
त्यानंतर हजारो लोकांसाठी जेवणाची व्यवस्था युवा जनशक्ती ग्रुप कौडगांव च्या माध्यमातून करण्यात आली होती हजारो लोकानी मिष्ठान्न चा आस्वाद घेऊन जेवणाच्या पंगती उठून भरपूर अन्न शिल्लक राहिल्याचे पाहिला मिळाली त्यानंतर रात्री प्रबोधनकार तुकाराम सुवर्णकार व शाहीर गोरख आणि महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका साक्षी साळवे यांचा प्रबोधन पर गीतांचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी युसुफ वडगांव पोलिस स्टेशनचे प्रमुख मा.उबाळे साहेब(A P I) व त्यांचे सहकारी पोलिस बांधव यावेळी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम पार पडण्यासाठी युवा जनशक्ती ग्रुप चे सर्व युवा तरुण मित्र ,प्रतिष्ठित नागरिक ,कौडगांवचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सदस्य व इतर समस्त गावकऱ्यांनी मेहनत घेऊन प्रचंड उत्साहात सदरील कार्यक्रम पार पाडून इथून पुढे गावातील सर्व कार्यक्रम आम्ही एकोप्याने आणि सामुदायिक स्वरूपाची साजरे करू अशी यावेळी सर्वांनी मनोमन शपथ घेतल्याचे यावेळी गावकऱ्यांनी बोलून दाखवले.
Comments
Post a Comment