27 एप्रिल रोजी बीड येथे होत असलेल्या ओबीसी मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी गेवराई ते वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न


गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहेकर :-गेवराई तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष उद्धवजी खाडे यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडी च्या गेवराई येथील संपर्क कार्यालय मध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीस गेवराई तालुक्यातील आजही माझी पदाधिकारी सर्कल प्रमुख प्रमुख गणप्रमुख व गेवराई शहरातील पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली यावेळी 27 एप्रिल रोजी बीड येथे होत असलेल्या ओबीसी मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी व आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका पूर्ण ताकतीनिशी लढवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष उद्धवजी खाडे साहेब त्याने सविस्तर मार्गदर्शन केले या बैठकीस बीड जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध वीर दगडू दादा गायकवाड यांचे प्रमुख उपस्थिती होती यावेळी गेवराई तालुक्यातून जिल्हा उपाध्यक्ष सुदेश पोतदार भटके विमुक्त राज्य सदस्य भीमराव महाराज चव्हाण वंचित चे शहराध्यक्ष दस्तगीर शेख वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोरजी भोले तालुका प्रसिद्धीप्रमुख ज्ञानेश्वर हवाले युवा नेते सचिन कांडेकर वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष किशोर जी चव्हाण सहसचिव बाबासाहेब शरणांगत माजी शहराध्यक्ष अजय भाऊ खरात राजकुमार गायकवाड बाजीराव बाबर शेख अखिल रामेश्वर चव्हाण मुन्ना पहाडमुखे सुदाम मोरे संजय शरणांगत यासह गेवराई तालुक्यातील जिल्हा सर्कल प्रमुख गणप्रमुख आजी-माजी पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते या बैठकीचे उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन प्रसिद्धीप्रमुख ज्ञानेश्वर हवाले यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोरजी भोले यांनी केले आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार प्रदर्शन वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका उपाध्यक्ष किशोरजी चव्हाण यांनी आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले 

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी