कडा कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार समिती आष्टी यांच्या वतीने रामशेठ मधुरकर यांचा बिनविरोध संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न
आष्टी( प्रतिनिधी)
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून आमदार सुरेश धस यांच्या गटाचे १२ संचालक , माजी आमदार भीमराव धोंडे यांचे समर्थक ०३ संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आणि माजी आमदार साहेबराव दरेकर यांचे ०३ संचालक अविरोध निवडून आले असल्यामुळे कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध पार पडली आहे नवनिर्वाचित संचालक रामशेठ बाळनाथ मधुरकर यांचा आज शुक्रवार दि.21.04.2023 रोजी कडा कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार समिती आष्टी यांच्या वतीने रामशेठ मधुरकर हे बिनविरोध संचालक झाल्या बद्दल कडा कृषी उत्पन्न उप बाजार समिती आष्टी येथील आडत व्यापारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी प्रा.रावसाहेब काळे ,मनोहर कवडे ,गौतम धस ,विठ्ठल राख ,सुनिल कुलकर्णी ,सिध्देश्वर सुनिल ,सचिन शेकटे, तूकाराम म्हेत्रे, संतोष शेकडे , कमलाकर शिंदे , व ईतर व्यापारी उपस्थित होते
Comments
Post a Comment