वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे यांनी सावंत कुटुंबीयांची घेतली सांत्वन भेट
आष्टी / बीड ( प्रतिनिधी -गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील सांगवी येथील राणीताई सावंत या शेतात काम करत असताना अचानक वादळ पाऊस विजांचा कडकडाट सुरू झाला आणि विज अंगावर पडून यात त्यांचा मृत्यू झाला .
या घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे यांना मिळताच आष्टी तालुक्यातील सांगवी या गावी सावंत कुटुंबीयांची सांत्वन भेट घेऊन सावंत कुटुंबीयांना धीर दिला . राणी सावंत यांच्या पाश्चात पती मुलं असून सावंत कुटुंबियांना शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे यांनी जाहीर केले .
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हा अध्यक्ष अनुराग वीर , आष्टी तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष किरण भाऊ आखाडे , अमोल साखरे , दादासाहेब गायकवाड ,आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते .
Comments
Post a Comment