तळवट बोरगाव येथे अज्ञात जातीवादी लोकांनी बॅनर फाडले गावात तणावाचे वातावरण

 गेवराई तालुक्यातील मौजे तळवट बोरगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौकात बॅनर लावले असता रात्री गावातील काही जातीवादी लोकांनी जाणूनबुजून बॅनर फाडले त्यामुळे गावातील बौध्द समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून तलवाडा पोलिस प्रशासनाने संबंधित अज्ञात जातीवादी लोकावर कडक कारवाई करण्यात यावी व आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी बौध्द समाजाने कडक भूमिका घेतली असून गावांमध्ये जंयतीला गालबोट लागू नये यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत असे बौध्द समाजाकडून मागणी होत तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर फाडलेल्या जातीवादी लोकावर ककड कारवाई करण्याची मागणी समाज बांधवांकडून होत आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी