नगरदेवळा येथे चिमुकलीने पूर्ण केले रमजानचे२९(रोजे) उपवास.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
पवित्र रमजान महीन्यात पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा इरफान शेख रऊफ याच्या मुलगी व अंशरा शेख यांनी रोजे पूर्ण केले आहे.
सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हात पहाटे सकाळी चार वाजेला सहेरी जेवन करुण ते सायंकाळी सात वाजे पर्यंत ना अन्न ना पाणी घेता उपासी पोटी राहून अंशरा शेख यांनी अल्लाह प्रति श्रद्धा व्यक्त केली. सध्या नगरदेवळा शहराचे तापमान ४० ते ४२ अंश से तापतानाची पातळी बघावयास मिळत आहे. इतक्या उन्हात सामान्य माणसाला बाहेर फिरणे कठीण आहे. लोकाना उन्हाचा त्रास होत आहे. इतक्या कठीण परिस्थितीत रखरखत्या उन्हात चिमुकलीनी अंशरा शेख रमजानचा उपवास यशस्वी रित्या पूर्ण केला आहे. मुलगी वयाच्या ७ व्या वर्षी अंशरा शेख इरफान आपल्या जीवनाचा रमजानचा २९ रोजे पूर्ण केल्याबद्दल गावात कौतुक होत आहे.अंशरा शेख ही शिव सेना ठाकरे गट अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष जिब्बू शेख व अच्चु पैहलवान यांची पुतणी आहे
Comments
Post a Comment