कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी जनविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या - निलाताई पोकळे
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत शेतकरी जनविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा पाटोदा शिरूरच्या सर्वांगिण विकासासाठी व आमदार बाळासाहेब आजबे यांचे हात बळकट करण्यासाठी पाटोदा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी जनविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असे आवहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुका अध्यक्ष निलाताई पोकळे यांनी केले याबाबत सविस्तर वृत्त असे की पाटोदा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक जाहीर झाले असून बाजार समितीमध्ये शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडण्यासाठी लोकनेते आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत असून विरोधी पक्षाच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मतदारांनी पाटोदा शिरुर मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी दमदार आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिलेल्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करावे असे आवाहान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुका अध्यक्ष निलाताई पोकळे यांनी केले आहे
Comments
Post a Comment