कुमशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशोक हिंगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण



बीड प्रतिनिधी - दि.30 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मौजे कुंमशी येथे 30 एप्रिल रोजी जयंती साजरी करण्यात आली या जयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक पाटील, वंचित चे नेते ईजि,विष्णू देवकते, बबनराव वडमारे, बालाजी जगतकर, बीड तालुका अध्यक्ष किरण वाघमारे सह गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सर्वप्रथम अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कुमशी येथील जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे शाल, हार घालून स्वागत व सत्कार केला. जयंतीच्या निमित्ताने मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी बोलताना सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाज घटकासाठी काम केले आहे, त्यांच्या कार्याचा आदर्श आपन सर्वांनी घेतला पाहिजे व सर्वांनी त्यांच्या विचाराचे व कार्याचे स्मरण केले पाहिजे,सर्व महापुरुषांच्या जयंत्या एकोफ्याने साजर्या केल्या पाहिजे, यावेळी इतरही मान्यवरांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला गावातील गावकरी प्रतिष्ठित नागरिक, महिला, पुरुष, तरुण बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुमशी येथे जयंती मोठ्या थाटामाटात व शांततेत संपन्न झाली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी