साधना वाचनालयातर्फे जागतिक ग्रंथ दिनानिमित्याने समाजसुधारकाच्या पुस्तकांचे प्रदर्शन.


                 
  मालेगाव (प्रतिनिधी)- .वाचन ही प्रक्रिया निरतंनपणे सुरुच राहणार असून फक्त माद्यमे बदलतील त्यामुळे वाचन चळवळी ची काळजी वाहण्याची गरज नाही. असे प्रतिपादन कवी, गझलकार सुरेंद्र टिपरे यांनी येथे केले. साधना वाचनालय, संगमेश्वर येथे आज जागतिक ग्रंथ दिवस साजरा करण्यात आला. वाचनालयाचे संचालक सुधाकर बागुल कार्यक्रमाच्या
अध्यकस्थानी होते.
  झाडाची पाने नंतर पुस्तके व आता संगणक याद्वारे वाचन सुरुच आहे. असे सांगून टिपरे यांनी ग्रंथ व वाचन यांचे महत्व सांगून जगातील क्रांती ग्रंथामुळे झाली.आक्रमकत्यानी सर्व प्रथम ग्रंथालये जाळली. ग्रंथामुळे प्रगती झाली. संत ज्ञानेश्वरानी पसायदानात ग्रंथाचे महत्व विषद केले आहे असे टिपरे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. 
प्रारभी थोर समाजसुधारकांच्या विविध पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन ग्रंथपुजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. म.ज् योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, म. गांधी आदीची ग्रंथ प्रदर्शनात मांडण्यात आले होते. बाल वाचक सुमित डामरे, उर्वल जाधव, वाचनालयाचे सह सचिव किशोर मोरे, भगवान महाले, सहाय्यक ग्रंथपाल मनीषा पाटील राष्ट्र सेवा दलाचे रविराज सोनार, नचिकेत कोळपकर यांनी ग्रंथाविषयी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक व सूत्रसंचालन राजीव वडगे यांनी केले. समारोप व आभार वाचनालयाचे सेक्रेटरी अशोक पठाडे यांनी मानले.
  कार्यक्रमास जेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर वारुळे, बळवंत अहिरे, दिलीप खेरनार, दिलीप वैदय, निशांत माळी निवृत शिक्षक मंडळ यांचे सह वाचक, कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी