सहकारात पुन्हा एकदा गुळवेचांच करिश्मा



   ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- (नवनाथ गायकर यांजकडुन) -
    नाशिक जिल्हयातील लाखोची उलाढाल असणारी व बहुचर्चित अशी ईगतपुरी तालुक्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा संदिप गुळवे यांचे रुपाने गुळवेचेंच कायम वर्चस्व राहिले आहे. गेली पाच दशके गुळवे यांचेच बाप लेकाच्या हाती सत्ता कायम रहावी हा एक करिश्माच असुन एक विक्रमच मानावा लागणार आहे. 
   कै.गोपाळराव गुळवे यांनी तब्बल चार दशके या बाजार समितीवर आपले वर्चस्व ठेवले होते.त्यांचे निधनानंतर बाजार समितीची सत्ता सुत्रे संदिप गुळवे यांचेकडे आली.प्रारंभी सहानुभुती म्हणुन व वडिलाचीं पुण्याई चे बळावर गुळवे हे सत्ता पुढील काळात राखण्यात यशस्वी ठरले खरे.पण नंतर मात्र बाजार समितीवर दोनदा सत्ता प्राप्तीनंतर गुळवे हटाव मोहिमेचाकाही लोकानीं प्रारंभ केला.या निवडणुकीच्या दरम्यान हा तीव्र विरोध ठळकपणे जाणवला.
   मात्र यानंतर ही गुळवे यांनी स्वत:चे नेतृत्व सिद्ध करत एकहाती विजय खेचुन आणला आहे. या मागे गुळवेनीं केलेले बेरजेचे राजकारणच कारणीभुत आहे.
  ईगतपुरी तालुक्यात सहकार म्हंणजे गुळवे हे समीकरण पक्के आहे.या समिकरणाची मांडणीच मोडण्याचा काहिनीं प्रयत्न केला होता.
   गावोगावी सहकारी संस्था वर गुळवेचें वर्चस्व आहे. हया वर्चस्वालाच हादरा देण्याचा काहीनीं प्रयत्न केला.आणि बर्याच प्रमाणांत ही मंडळी यात यशस्वी ही झाली होती. त्यामुळे गुळवे समोर बाजार समिती निवडणुकीत कडवे आव्हान ठाकणार याची जोरदार चर्चा सुरु झाली होती.अगदी त्या दिशेनेच हालचालीही सुरु झाल्या होत्या.
   मात्र हा धोका वेळीच ओळखुन संदिप गुळवे यांनी संभाव्य विरोधकानांच चक्क आपल्या गोटात खेचुन मुळ विरोधकच गायब केल्याने या निवडणुकीतील हवाच निघुन गेली होती.
   गुळवे यांनी गोरख बोडके, निवृत्ती जाधव, शिवराम झोले, सुनिल जाधव, भाऊसाहेब कडभाने, भाऊसाहेब खातळे आदि सर्वच राजकिय दिग्गज नेत्यानां एकत्र करत मोठीच ताकद उभी केली. तिथेच गुळवेचां विजय पक्का झाला. 
   गुळवेच्यां विरोधात माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, संपतराव काळे, भास्करराव गुंजाळ, जनार्दन माळी, राजु नाठे, उदय जाधव आदिनीं रान पेटवले खरे, मात्र या नेत्याचीं गावो गावी सहकारी संस्था व ग्रा.प.वर फारसे वर्चस्व नसल्याने त्यांची ताकद तोकडी पडली.
   संदिप गुळवे यांनी बाजार समितीचा मतदार केंद्रित करत कितीतरी अगोदर पासुनच मोर्चेबांधणी केलेली होती. व्यक्तिशः: गावोगावच्या निवडणुकीत लक्ष घालुन आपल्या समर्थकानां बळ देण्याचं काम त्यांनी केलं होतं.तुलनेत या आघाडीवर विरोधक मात्र फारसे सक्रियण न राहिल्याने गुळवे यांचे पारडे प्रारंभापासुनच जड होते. त्यातच गुळवेच्यां विरोधात थोडा फार विरोधाचा सुर काढणारे नेतेच गुळवेनीं आपल्या तंबुत ओढल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. 
   एकुणच पाच दशकापासुन गुळवे नावाची जादु कायम ठेवण्यात संदिप गुळवे यांना यश आले असुन सहकारात आपणच किंग असल्याचे दाखवुन देत आपले नाणे खणखणीत असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. आगामी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बैंकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीचाही मार्ग गुळवेनीं मोकळा करुन घेतला आहे हे ही निश्चिंत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी