आधुनिक युगातील दानशूर कर्ण म्हनून भाऊसाहेब आण्णा भवर यांची पंचक्रोशीत ओळख

आधुनिक युगातील दानशूर कर्ण म्हनून भाऊसाहेब आण्णा भवर यांची पंचक्रोशीत ओळख

अंमळनेर पंचक्रोशीत कोठेही हरिनाम सप्ताह्यामध्ये“अन्नदानाचा”यज्ञ करणारा जनसेवक भाऊसाहेब भवर

 पाटोदा (गणेश शेवाळे)संपत्ती सर्वांकडे असती मदत करायला पण दानतच लागते आशेच काही बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव सारख्या खेडेगावातील एक सामान्य माणूस भाऊसाहेब भवर यांचा कडुन पाहिला मिळते एका छोट्या गावातुन गेली अनेक वर्षे अखंडपणे अंमळनेर पंचक्रोशीत अखंड हरिनाम सप्ताहृया मध्ये अन्नदान 
वाटपाचे चांगले काम करत आहे. भाऊसाहेब भवर हे सप्त्याह्यामध्ये अन्नदान करत एवढ्यावरच न थांबता ग्रामीण भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून विविध गावात शासकीय निधीची वाट न पहाता स्वखर्चातून शाळा खोल्या बांधून दिल्या तसेच अनेक शाळेला आर्थिक मदत ही करत आहेत आयुष्य जिकिरीचं असतं समस्यांनी भरलेलं असतं पण त्यातून देखील रडकुंडीचा डाव न मानता आयुष्य घडवणारा संग्राम करून इतरांच्या आयुष्यात मदतीचा नंदादीप तेवत ठेवण्याचे काम करणाऱ्या या अवलियाची ही कथा…!!
‘स्वतः साठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ‘या विचाराने प्रेरित झालेली माणसे माझा जन्म कशासाठी झाला आहे ? मी कशासाठी जगतो? आणि माझे जीवनाचे ध्येय काय? असा विचार करून आपले सर्व आयुष्य समाजासाठी वेचतात. समाजाच्या कल्याणासाठी धडपडत असतात. अशी जी काही थोडी माणसं आहेत त्यात प्रामुख्याने ज्यांचे नाव घ्यावे लागेल ते म्हणजे पाटोदा तालुक्यातील मुगगाव सारख्या एका खेडेगावातील भाऊसाहेब भवर आहेत लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वर प्रेरित होऊन आपल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला.आपले आयुष्य समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, पिडीत, वंचित या घटकांसाठी घालवायचे असा ठाम निर्धार केला. मुगगाव ही आपली कर्मभूमी समजून आपल्या सामाजिक कार्याला सुरूवात केली. दुःखीतांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा निश्चय केला. हाच निश्चय भवर यांना नवी ओळख देऊन वेगळ्या उंचीवर घेऊन गेला.
भाऊसाहेब भवर यांनी केलेल्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार, मान सन्मान मिळाले आहेत. अमाप प्रसिद्धीही मिळाली. त्याच्या मागे आहे त्यांची समाजाप्रती असणारी तळमळ! मी समाजाचे, देशाचे काही तरी देणं लागतो ही भावना परिस्थितीने त्यांच्यात निर्माण केली. ज्यावेळी प्रत्येकाच्या मनात ही भावना जागृत होईल त्यावेळी समाजातील प्रत्येकाचे भले झाल्याशिवाय राहणार नाही.
भवर यांनी समाज आणि सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम करताना एक अभिनव असा उपक्रम सुरू केला. ज्याची जिल्हाभर चर्चा झाली अशी समाजसेवा करण्यासाठी रक्तातच मानवसेवा असावी लागते. ती भाऊसाहेब भवर यांच्यात आहे. म्हणून कितीही ञास झाला, वाईट प्रसंग आले तरी ते डगमगले नाहीत. उलट आणखी जोमाने त्यांनी हे समाजसेवेचे व्रत हाती घेतले.सामान्य लोकांच्या आयुष्यात सुखाची कारंजी फुलविण्याचे त्यांचे हे कार्य प्रशसंनीय आहे.
समाजसेवा करणे हे कोणाचेही काम नाही त्यासाठी मनात असावा लागतो मनात निस्वार्थी सेवाभाव आणि त्याग हे भवर यांचा कार्यातून पाहिला मिळत असून आधुनिक युगातील दानशूर कर्ण म्हणून भाऊसाहेब भवर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी