मार्केट कमिटीतील भ्रष्टाचाराचा अड्डा मोडीत काढण्यासाठी शेतकरयांच्या पोरांना संधी दया-- पवन कुचेकर
(बीड प्रतिनिधी) बीड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक ही परिवर्तनाची निवडणुक ठरणार असुन चाळीस वर्षापासूनची जुलमी राजवट उलथुन टाकणायासाठी मतदारांनी शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या स्वाभिमानी उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी केले आहे. शेतकरी परिवर्तन महाआघाडीची ताकत ही शेतकरयांच्या हिताची आहे
आज सर्व सामान्य घरातील शेतकरयांची पोर निवडणुकीच्या रंणागंणात उतरलेले आहेत बीडची बाजार समिती अनेक वर्षांपासून त्याच त्याच लोकांच्या ताब्यात आहे
शेतकरयांच्या घामाच्या कष्टातुन आलेल्या संपत्तीवर डोळा ठेवुन गेल्या चाळीस वर्षात भ्रष्टाचाराचा मोठा कळस गाठला आहे हा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment