'मन की बात' कार्यक्रमाचा 100 व्या भागात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - मा.आ भीमराव धोंडे

आष्टी प्रतिनिधी

'मन की बात' कार्यक्रमाचा 100 व्या भागात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे मा.आ भीमराव धोंडे यांनी केले आहे 'मन की बात'कार्यक्रमाचा 100 वा भाग रविवारी 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे प्रसारण केवळ भारतच नव्हे तर जगभर प्रसारित करण्यात येणार आहे. पतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. उल्लेखनीय असे की हा कार्यक्रम पूर्णपणे ध्वनिमुद्रीत म्हणजेच ऑडिओ रुपात असतो. 'मन की बात' कार्यक्रम जगभरात प्रसारित व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष देखील जोरदार तयारी केली असुन मन की बातचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. 100 व्या भागात आष्टी-पाटोदा -शिरुर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे नेते मा.आ.भीमरावजी धोंडे यांनी केले आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी