पिक कर्जासाठी लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर अँड. गणेश वाणी यांचे उपोषण
पिक कर्जासाठी लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर अँड. गणेश वाणी यांचे उपोषण शाखा व्यवस्थापक सोन्याबापू रासकर यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित; मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत व तलाठी गणपत पोतदार यांची मध्यस्थी लिंबागणेश (दि.०१ ) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरल्यानंतरही पिक कर्ज मिळत नसल्याच्या मागणीसाठी अँड. गणेश वाणी यांनी लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर सहकाऱ्यांसमवेत गुरुवार, दि. १ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केले. पिक कर्ज मिळावे यासाठी बँकेकडे लेखी अर्ज करूनही कर्ज प्रक्रिया पुढे न गेल्याने त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते. मंडळ अधिकारी व तलाठ्यांची मध्यस्थी उपोषणाची माहिती मिळाल्यानंतर लिंबागणेश महसूल मंडळाच्या मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत व तलाठी गणपत पोतदार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन अँड. गणेश वाणी तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक सोन्याबापू रासकर यांच्याशी चर्चा केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत त्यांनी मध्यस्थी केली. यावेळी बँकेच्या वतीने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक त...