जिरेवाडीच्या तुळजाभवानी मंदिरात ऐन नवरात्रीत अंधार

जिरेवाडीच्या तुळजाभवानी मंदिरात ऐन नवरात्रीत अंधार 

​
बीड तालुक्यातील जिरेवाडी येथील प्रसिद्ध श्री तुळजाभवानी व आंबा देवी मंदिराचा वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे. ऐन नवरात्रोत्सवाच्या काळातच मंदिरात अंधार पसरल्याने दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
​
​मिळालेल्या माहितीनुसार, सदर मंदिराच्या जागेचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. कोर्टात प्रकरण सुरू असतानाच महावितरण व प्रशासनाने ऐन नवरात्रीच्या काळात मंदिराची वीज कापल्याचा आरोप मंदिर व्यवस्थापनाने केला आहे. याबाबत ७ आणि ८ तारखेला महावितरणकडे तक्रार अर्ज देऊनही वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आलेला नाही.
​
​संपूर्ण नवरात्रोत्सव अंधारातच पार पडल्याने भाविकांना अंधारातच देवीच्या दर्शनाची कसरत करावी लागली. रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात अंधार असल्यामुळे साप, विंचू व इतर सरपटणारे प्राणी निघण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे
ऐन सणासुदीच्या दिवसांत भाविकांची होणारी गैरसोय पाहता प्रशासनाने या प्रकरणात तात्काळ मध्यस्थी करून मंदिराचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी जिरेवाडीतील नागरिक व भाविकांकडून केली जात आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी