तिर्थपुरी-जालना येथील आंतरजिल्हा चोरट्यांची टोळी जेरबंद; बीड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
तिर्थपुरी-जालना येथील आंतरजिल्हा चोरट्यांची टोळी जेरबंद; बीड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
बीड प्रतिनिधी :तिर्थपुरी-जालना परिसरातील घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या एका अट्टल आंतरजिल्हा टोळीचा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलीस पथकाने टोळीतील ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे घरफोडी आणि वाहन चोरीचे एकूण ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस ठाणे नेकनूर येथील गु.रं.नं. ४४१/२०२६ (कलम ३०५, ३३१(४) भारतीय न्याय संहिता) या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते. तपासादरम्यान घटनास्थळाची पाहणी करून आणि परिसरातील CCTV फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेण्यात आली.
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, सदर गुन्ह्यातील आरोपी हे लाल-काळ्या रंगाच्या टीव्हीएस गाडीने जालन्याहून गेवराईमार्गे बीडकडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार दिनांक ३०.१०.२०२६ रोजी गेवराई बायपास येथे सापळा रचून संशयित गाडी अडवण्यात आली व गाडीतील ४ चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले.
१. बालसिंग अमलरसिंग टाक (वय ३० वर्षे)
२. नानकसिंग मंगबलसिंग बावरी (वय २२ वर्षे)
३. अरूणसिंग जगतापसिंग बावरी (वय २० वर्षे, रा. संभाजीनगर, तिर्थपुरी, ता. घनसांगवी, जि. जालना)
४. इरफान वनिमियाँ सय्यद (वय २० वर्षे, रा. रुई, ता. अंबड, जि. जालना)
उघडकीस आलेले गुन्हे व जप्त मुद्देमाल:
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे बीड जिल्ह्यातील चोरीच्या घटनांबाबत सखोल चौकशी केली असता, त्यांनी खालील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे केल्याची कबुली दिली:
पोलीस ठाणे नेकनूर: गु.रं.नं. ४४१/२०२६ (कलम ३०५, ३३१(४) BNS)
पोलीस ठाणे धारूर: गु.रं.नं. १०/२०२६ (कलम ३०५, ३३१(४) BNS)
पोलीस ठाणे केज: गु.रं.नं. ६२४/२०२६ (कलम ३०३(२) BNS)
पोलीस ठाणे बिंदूदूध: गु.रं.नं. ०९/२०२६ (कलम ३०५, ३३१(४) BNS)
आरोपींच्या ताब्यातून चोरीचा १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी आरोपींना मुद्देमालासह पोलीस ठाणे नेकनूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहा. पोलीस अधीक्षक श्री. व्यंकटराम व पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि महेश विछवे, पोह/बप्पासाहेब घोडके, पोह/जफर पठाण, पोह/महेश जोगदंड, पोह/दिलीप गित्ते, चापोह/गणेश मराठे व पोअ/विकी सुरवसे यांच्या पथकाने केली आहे.
Comments
Post a Comment