बीडमध्ये व्हीएसपी प्रीमियर लीगचा खेळाडू लिलाव उत्साहात

बीडमध्ये व्हीएसपी प्रीमियर लीगचा खेळाडू लिलाव उत्साहात

बिलाल मेंबर प्रस्तुत व्हीएसपी प्रीमियर लीग; हॉटेल नीलकमल येथे मान्यवरांची उपस्थिती
बीड : बिलाल मेंबर प्रस्तुत व्हीएसपी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंचा लिलाव रविवारी हॉटेल नीलकमल येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेसाठी जवळपास १०० ते १२० खेळाडूंनी नोंदणी केली होती. लिलाव प्रक्रियेनंतर आठही संघमालकांनी आपल्या संघांची बांधणी पूर्ण केली.

या स्पर्धेत नवले वॉरियर्स, व्ही आर रॉयल्स, माही सुपर किंग्स, वायबीके टायगर्स, एसकेपी, केएस कन्स्ट्रक्शन, वुडलँड सीसी आणि फ्रेंड्स क्रिकेट क्लब या आठ संघांचा समावेश आहे. खेळाडूंच्या लिलावामुळे स्पर्धेतील क्रिकेटचा उत्साह वाढला असून, आता प्रत्यक्ष सामन्यांमध्ये कोणता संघ बाजी मारणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

या कार्यक्रमाला गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयराजे पंडित, दैनिक सिटीझनचे संपादक, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब भाई, नगरसेवक दिनेश मुंदडा, ज्येष्ठ नगरसेवक जैतुल्ला खान, वकील सर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल बिलाल मेंबर यांचे कौतुक केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी