आ. सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा – जिल्हाध्यक्ष शरदराव मगर

आ. सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा – जिल्हाध्यक्ष शरदराव मगर

बीड जिल्हा मुप्टा शिक्षक संघटनेची प्रचारात आघाडी; पदवीधर मतदारांना मतदानाचे आवाहन
बीड (प्रतिनिधी) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. या निवडणुकीत आमदार सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मुप्टा शिक्षक संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर यांनी केले आहे.

आमदार सतीश चव्हाण यांनी गेल्या अठरा वर्षांपासून औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून, पदवीधरांचे विविध प्रश्न तसेच मराठवाड्यातील शिक्षक आणि प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी काम केले असल्याचे शरदराव मगर यांनी सांगितले.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये आणि ७६ तालुक्यांमध्ये मुप्टा शिक्षक संघटनेचा जनसंपर्क असून, पदवीधर मतदार नोंदणीमध्ये संघटनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. बीड जिल्ह्यात संघटनेच्या माध्यमातून एक हजारांहून अधिक पदवीधर मतदारांची नोंदणी झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

संघटनेचे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांच्या नेतृत्वाखाली मुप्टा शिक्षक संघटना आमदार सतीश चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. संपूर्ण मराठवाड्यात प्रा. सुनील मगरे यांनी प्रचाराला गती दिली असून, या निवडणुकीत मुप्टा शिक्षक संघटनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास शरदराव मगर यांनी व्यक्त केला.

बीड जिल्ह्यातही मतदार नोंदणीपासून प्रचारापर्यंत संघटनेने सक्रिय सहभाग घेतला आहे. पदवीधर मतदारांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपले अमूल्य मत आमदार सतीश चव्हाण यांना द्यावे आणि त्यांना मोठे मताधिक्य मिळवून द्यावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष शरदराव मगर यांनी केले.

या आवाहनात जिल्हा सचिव प्रा. शशिकांत जावळे, प्रा. नारायण घोलप, प्रवीण तरकसे, भैय्यासाहेब आदोडे, डॉ. शंकर वाघमारे, डॉ. मनोहर सिरसाट, श्रीकांत वारभुवन, प्रा. संजय बागुल, प्रमोद साळवे, शैलेश चिलवंत, रोहित डोंगरे, शेख अनवर, दिलीप जोगदंड, सोमेश्वर गचांडे, शकील पठाण, भीमा सरपते, अमित वाघमारे, अमोल राऊत, पांडुरंग कारंडे, प्रकाश शिंदे तसेच जगदाळे सर, अरफत सर, भोसले सर, डोंगरे सर आणि गायकवाड सर यांचा समावेश आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी