बीड जिल्हा दुष्काळ ग्रस्त असल्यामुळे बचत गट मार्फत जमा करण्यात येणारे व्याजाचे हप्ते 6 ते 8 महिन्यासाठी बिनव्याजी स्थगित करण्यात यावे ही राष्ट्रीय काँग्रेसची मागणी
बीड जिल्हा दुष्काळ ग्रस्त असल्यामुळे बचत गट मार्फत जमा करण्यात येणारे व्याजाचे हप्ते 6 ते 8 महिन्यासाठी बिनव्याजी स्थगित करण्यात यावे ही राष्ट्रीय काँग्रेसची मागणी .
यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
बीड प्रतिनिधी. सध्या महाराष्ट्र राज्यात दुष्काळ जाहीर झालेला आहे सध्या बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे बीड जिल्ह्यात जवळपास दुष्काळ पडलेला आहे त्यामुळे या भागातील लोकांना जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
सदरील भागातील बहुतांश लोक हे ऊसतोड, बांधकाम मजुरी व बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या कामावर अवलंबित आहेत सध्या दुष्काळ असल्यामुळे व पाणी उपलब्ध नसल्यामुळे शासनाने जवळपास सर्वच बांधकामाच्या कामावर निर्बंध घातलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हाताला काम मिळेल असे झालेले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे सदरील बाबीमुळे ज्या लोकांनी बचत गटामार्फत कर्ज घेतलेले आहे ते कर्ज सदरील मजूर वर्गास फेळणे शक्य होत नाही तसेच कर्ज वेळेवर भरले नाही तर त्यावरील व्याज वाढतच चाललेला आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांना बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून बचत गटाचे हप्ते पुढील 6 ते 8 महिन्यांसाठी बिनव्याजी स्थगिती करण्यासाठी आपल्या मार्फत संबंधित बँक फायनान्स कार्यालयांना आयडीएफसी बँक, भारत फायनान्स बँक, चेतन बँक, इसाफ बँक, तसेच इतर बँकांना निर्देश देण्यात यावे अशा प्रकारची मागणी राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनाद्वारे केले आहे. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे बीड शहर अध्यक्ष मोहम्मद इलियास टेलर, बीड जिल्हा सरचिटणीस मिलिंद मस्के साहेब, राष्ट्रीय काँग्रेस निराधार निराश्रीत विभाग बीड जिल्हा अध्यक्ष शेख मोहसीन, इंटक चे बीड जिल्हा अध्यक्ष जमाले साहेब, राष्ट्रीय काँग्रेस निराधार विभाग चे बीड तालुका अध्यक्ष शेख जहीर आमिर, कार्याध्यक्ष जमील खान सत्तार खान, राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग बीड शहर अध्यक्ष सय्यद फरहान शराफत, नितीन बलराज पिवळ, शेख मोहम्मद अमेर, शेख अहमद, शेख जावेद, शेख अजीम लतीफ, मन्सूर खान उस्मान खान, व बचत गट मधील हप्ते भरणाऱ्या महिला देखील उपस्थित होते.
Comments
Post a Comment