चमत्कार दाखवतो म्हणून प्रवाशाला लुटणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चमत्कार दाखवतो म्हणून प्रवाशाला लुटणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
परळी बसस्थानकात प्रवाशांना ‘चमत्कार दाखवतो’ असे सांगून लुबाडणाऱ्या नाशिक येथील सराईत गुन्हेगाराला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली आहे.  
दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी परळी बसस्थानकात गणपत लक्ष्मण आंधळे (रा. हेळंब, ता. परळी) हे थांबले असताना, एका अनोळखी इस्माने त्यांच्या हातातील दगदाचा खडा करून रुद्राक्ष करण्याचा बहाणा केला. यादरम्यान त्यांच्या हातातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे १,०७,००० रुपये) चोरोन नेली. याप्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  
​
गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले व गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळवली. हा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अफजल नवाब मदारी (वय २५ वर्षे, रा. लक्कडकोट, ता. येवला, जि. नाशिक, ह.मु. सावरगाव, ता. येवला) याने केल्याचे समोर आले.  
​पोलिसांनी येवला (नाशिक) येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेला १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास परळी शहर पोलीस करीत आहेत.  
​ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहा.पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुशांत सुतळे,मारोती कांबळे,सचिन सानप,गोविंद भताने,सचिन आंधळे,अतुल हराळे वविकी सुरवसे यांनी केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी