Posts

Showing posts from September, 2026

हिंदू विधीज्ञ परिषदेचे शासनाला आवाहन,राज्यातील भीषण पाणीटंचाईवर तातडीने आणि कठोर पावले उचलावीत

Image
हिंदू विधीज्ञ परिषदेचे शासनाला आवाहन  राज्यातील भीषण पाणीटंचाईवर तातडीने आणि कठोर पावले उचलावीत       मुंबई -यावर्षी पावसाचे अल्प प्रमाण आणि त्यामुळे खालावलेला भूगर्भातील पाण्याचा साठा पहाता येत्या काळात राज्यात भीषण पाणीटंचाई येण्याची दाट शक्यता आहे. पाणीटंचाईच्या या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी हिंदू विधीज्ञ परिषदेने अत्यंत अभ्यासपूर्ण उपाययोजना सरकारकडे पाठवून यावर तातडीने आणि कठोर पावले उचलण्याचे आवाहन सरकारकडे केले आहे. राज्यातील ३२ जिल्ह्यांतील २६५ तालुक्यांमध्ये प्राथमिक दुष्काळ घोषित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना निवेदनपर पत्र पाठवले आहे.      राज्यातील अनेक धरणांमध्ये केवळ २० ते ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील काही मासांत नागरिक, शेतकरी आणि उद्योग यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी स्थिती आहे. ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन येत्या काळात नागरिकांना पिण्याचे पाणी विनाअडचण उ...

महसूल व पोलीस प्रशासनाच्या पाठबळावर पवनचक्की कंपन्यांची ‘रझाकारी’ सुरू

Image
महसूल व पोलीस प्रशासनाच्या पाठबळावर पवनचक्की कंपन्यांची ‘रझाकारी’ सुरू! शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप; सौंदाना प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी – डॉ. गणेश ढवळे पाटोदा : (दि. ३०) पवन व सौर ऊर्जा कंपन्यांना शेतजमिनींचा ताबा मिळवून देण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यास पोलिसी दबाव, धमक्या व गुन्हे दाखल करण्याची भाषा केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पाटोदा तालुक्यातील सौंदाना शिवारातील पवनचक्की प्रकल्पावरून शेतकरी आणि जेएसडब्ल्यू एनर्जी पॉवर कंपनी यांच्यातील वादाला मंगळवारी (दि. २९) गंभीर वळण लागले. कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी जड साहित्य व इतर मटेरियलची वाहतूक सुरू असताना शेतकऱ्यांनी मोबदला व आपल्या हक्कांबाबत प्रश्न उपस्थित केल्याने तणाव निर्माण झाल्याचे सांगण्यात येते....

महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया बीड जिल्हाध्यक्षपदी बालाजी जगतकर यांची निवड

Image
महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया बीड जिल्हाध्यक्षपदी बालाजी जगतकर यांची निवड लोकशाही पद्धतीने झालेल्या मतदानात सर्वाधिक मते; नियुक्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार बीड | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात जिल्हानिहाय कार्यकारिणी स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्हाध्यक्षपदासाठी झालेल्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीत बालाजी जगतकर यांनी सर्वाधिक मते मिळवत बाजी मारली. त्यांची महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया बीड जिल्हाध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली. बीड शहरातील हॉटेल अन्विता येथे आयोजित विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ नेते वैभव स्वामी आणि आशा शेख यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदासाठी एकूण तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. उपस्थित सदस्यांनी लोकशाही पद्धतीने मतदान केले. या मतदानात बालाजी जगतकर यांना सर्वाधिक मते ...

मुंबई-पुण्याच्या धर्तीवर पिंपळवंडीत अत्याधुनिक अभ्यासिका

Image
मुंबई-पुण्याच्या धर्तीवर पिंपळवंडीत अत्याधुनिक अभ्यासिका  आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच निलेश मोरे यांचा पुढाकार; ग्रामीण विद्यार्थ्यांना गावातच मिळणार दर्जेदार सुविधा पाटोदा (प्रतिनिधी ) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मुंबई, पुणे यांसारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, आपल्या गावातच शांत, शिस्तबद्ध आणि आधुनिक अभ्यासाचे वातावरण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ग्रामपंचायत पिंपळवंडीच्या वतीने सुसज्ज व अत्याधुनिक अभ्यासिका उभारण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच निलेश मोरे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचेही सहकार्य लाभत आहे. शहराच्या धर्तीवर आधुनिक सुविधा मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या अभ्यासिकांच्या धर्तीवर पिंपळवंडी येथे आधुनिक पद्धतीची अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पिंपळवंडी तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळणार...

भारतीय दलित पँथर चे मराठवाडा महासचिव तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व सन्मान

Image
परळी ( प्रतिनिधी ) दिं. २८ परळी येथे भारतीय दलित पॅंथर च्या वतीने  सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक  जी.एस. सौंदळे सर, उप प्राचार्य चिंतामणी खंडागळे सर,पत्रकार सुकेशनी नाईकवाडे, माणिकराव बनसोडे यांचा सत्कार व सन्मान भारतीय दलित पँथर चे मराठवाडा महासचिव तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या हस्ते पुष्पहार, पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन करण्यात आला.       विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, परळी रेल्वे स्टेशन परिसर, परळी वैजनाथ जि. बीड येथे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय जी.एस. सौंदळे सर, चिंतामणी खंडागळे सर,पत्रकार सुकेशनी नाईकवाडे, माणिकराव बनसोडे यांचा सत्कार, सन्मान रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ०७:३० वाजता करण्यात आला आहे. यावेळी सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून धूप दीपचे प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी सामाजिक क्षेत्रात आपला अनमोल असा ठसा उठवणारे ज्येष्ठ समाजसेवक ...

लोकशाहीचे मारेकरी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Image
सदोष SIR प्रक्रिया थांबवा; पात्र मतदारांचे मतदानाचे अधिकार पुनर्स्थापित करा ! लोकशाहीचे मारेकरी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने – डॉ. गणेश ढवळे बीड : (दि.२८ ) मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण ( एसआयआर) संबंधित मुद्यांवर तिन सदस्यीय निवडणूक आयोगातील तीन पैकी दोन आयुक्त सुखबीर सिंह संधु आणि विवेक जोशी यांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले होते.एसआयआरची देशभरातील अंमलबजावणी तीनही निवडणूक आयुक्तांच्या देखरेखीखाली सुरू असताना मात्र संधु आणि जोशी यांनी त्यांना माहीती नसताना घेण्यात आलेल्या आदेशांवर गेल्या १० महिन्यात किमान १४ वेळा ( त्यापैकी एकाच दिवशी ४ वेळा) लेखी स्वरूपात आक्षेप घेतले होते मात्र मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पक्षपातीपणे मनमानी कारभार करत विद्यमान सरकारच्या हिताचे निर्णय घेतले त्यामुळे निष्पक्ष मतदान प्रकिया उद्ध्वस्त करणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून पायउतार करून तातडीने अटक करण्यात यावी तसेच  मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया सदोष अ...

‘कल्पतरु’च्या उपक्रमामुळे बीडमधील गणेश मंडळांना बळ : पंकजाताई मुंडे

Image
‘कल्पतरु’च्या उपक्रमामुळे बीडमधील गणेश मंडळांना बळ : पंकजाताई मुंडे ‘कल्पतरु प्रतिष्ठान’च्या उत्कृष्ट देखावा स्पर्धेतील विजेत्यांना मुंडे भगिनींच्या हस्ते बक्षीस वितरण बीड (प्रतिनिधी ) दि.२७ : गणेशोत्सवातील उत्कृष्ट देखाव्यांच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारा प्रबोधनात्मक संदेश दिला जातो. अशा स्पर्धांमुळे स्थानिक कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळून गणेश मंडळांना नवी ऊर्जा व प्रोत्साहन मिळते. ‘कल्पतरु प्रतिष्ठान’च्या अशा अभिनव उपक्रमांमुळे बीडमधील गणेश मंडळांना मोठे बळ मिळाले, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत ‘कल्पतरु प्रतिष्ठान’च्या पुढाकारातून गणेशोत्सवानिमित्त आयोजित इनोव्हेशन चॅलेंज-उत्कृष्ट देखावा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बीडमध्ये रविवारी (दि.२७) सौ.के.एस.के. महाविद्यालयातील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर क्रीडा संकुल व सांस्कृतिक सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ना.पंकजाताई मुंडे बोलत होत्या. ...

लिंबागणेश येथे मध्यरात्री धाडसी चोरी; १५ लाखांचा ऐवज लंपास

Image
लिंबागणेश येथे मध्यरात्री धाडसी चोरी; १५ लाखांचा ऐवज लंपास  ३ लाखांची रोकड, १५ तोळे सोने व २० तोळे चांदी चोरीला; नेकनूर पोलिसांकडून तपास सुरू बीड प्रतिनिधी : (दि.२७) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील डवरवाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडली. विलास बुवाजी जाधव यांच्या राहत्या घरातून सुमारे ३ लाख रुपये रोख, १५ तोळे सोने, २० तोळे चांदी असा एकूण सुमारे १५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे रिंकु अमोल जाधव यांनी सांगितले. मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर तत्काळ नेकनूर पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस कर्मचारी नवनाथ मुंढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व प्राथमिक चौकशी केली. चोरीप्रकरणी सकाळी तक्रार देण्यासाठी संबंधितांना नेकनूर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. या घटनेचा पुढील तपास नेकनूर पोलिस ठाण्याचे सपोनी मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. चोरीच्या घटनेमुळे लिंबागणेश परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच दुष्काळाच्या संकटाला सामोरे जात असलेल्या ग्रामस्थांमध्ये चोरीच्या घटनांमुळे...

आयडेंटिटी कार्ड कागदावरच; पंचायत समितीत प्रत्यक्षात गायब

Image
आयडेंटिटी कार्ड कागदावरच; पंचायत समितीत प्रत्यक्षात गायब! लेखी उत्तरात सर्वांच्या गळ्यात ओळखपत्र, पण कार्यालयात प्रत्यक्ष चित्र वेगळेच; नागरिकांचा संताप आष्टी प्रतिनिधी |  पंचायत समिती आष्टीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळी गळ्यात आयडेंटिटी कार्ड परिधान करावे, याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यावर गटविकास अधिकारी प्रयाग धमाल यांनी लेखी उत्तर देत “सर्व अधिकारी/कर्मचारी दैनंदिन ओळखपत्राचा वापर करीत आहेत”, असे स्पष्ट केले आहे. मात्र प्रत्यक्ष कार्यालयात गेल्यानंतर अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड दिसत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाचे लेखी उत्तर आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत असल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकारी कोण, हे शोधण्यासाठी नागरिकांची धावपळ! शासकीय कामासाठी पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांना संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी कोण आहे, हे ओळखण्यासाठी वारंवार चौकशी करावी लागते. खुर्चीवर नेमका संबंधित अधिकारी बसला आहे की दुसरे कोणी, याचा ताळमेळ लागत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. “लेखी ...

लिंबागणेश येथे कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी निदर्शने

Image
लिंबागणेश येथे कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी निदर्शने  मराठवाड्यात आठ महिन्यांत ६५३ शेतकरी आत्महत्या; सुरक्षेच्या नावाखाली शेतकऱ्यांची अवमानना करणाऱ्या व्यवस्थेचा निषेध : डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश : (दि.२५) पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप हंगामातील पिके करपली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समिती गठित करणे, लोकप्रतिनिधींचे दौरे, पंचनामे व अहवाल अशा औपचारिक प्रक्रियेत वेळ न दवडता शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व विविध सवलती द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. निवेदन मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत, तलाठी गणपत पोतदार, सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड, पोलिस जमादार उद्धव तांबे, नवनाथ मुंढे यांनी स्विकारले. यावेळी होमगार्ड शाळीग्राम घरत, गणेश कुलकर्णी, श्रीराम वाघमारे उपस्थित होते. या मागणीसाठी अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज शुक्रवार, दि.२५ रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शे...

बुद्ध माझा माती होता माती मध्ये विलीन झाला

Image
बुद्ध माझा माती होता माती मध्ये विलीन झाला.. कोणी म्हणतो छूत अछुत  कोणी म्हणतो वर्ण सवर्ण कोणी म्हणतो इटाळ चांडाळ तो तर होता माती  माती मध्ये विलीन झाला.. बुद्ध माझा माती होता माती मध्ये विलीन झाला.. कोणी म्हणे अवतार कोणी म्हणे चमत्कार  कोणी म्हणतो काळाची पुकार तो तर होता विद्न्यानाची झलकार म्हणून, माती मध्ये विलीन झाला. माती मध्ये विलीन झाला.. - कुणाल गायकवाड  

भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने तळवट बोरगाव येथे 'एकदिवसीय महिला-पुरुष शिबिर'

Image
भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने तळवट बोरगाव येथे 'एकदिवसीय महिला-पुरुष शिबिर'   ​गेवराई प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी तळवट बोरगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथे एकदिवसीय महिला-पुरुष समता सैनिक दल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.   ​संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक तथा कमांडर इन चीफ मिराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अ‍ॅड. भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि मुंबई कार्यालय प्रमुख एस. के. भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडणार आहे.   ​या शिबिराला महाराष्ट्र राज्य संरक्षण सचिव अमरसिंह ढाका, मेजर जनरल तथा संरक्षण उपाध्यक्ष कॅप्टन राजाभाऊ आठवले, कंपनी कमांडर प्रतिभा रंजित वाघमारे, गेवराई तालुका अध्यक्ष अनिल बोराडे आणि तालुका सरचिटणीस सुभाष बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.   अमरसिंह ढाका प्रमुख मार्गदर्शक व कॅप्टन राजाभाऊ आठवले मुख्य प्रशिक्षक तर कंपनी कमांडर प्रतिभाताई रंजीत वाघमारे, कंपनी कमांडर सुजाता प्रशांत वासनिक प्रशिक्षक म्हणून आहेत. बीड...

चौसाळ्याच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने माहिती अधिकाराचे केले उल्लंघन

Image
चौसाळ्याच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने माहिती अधिकाराचे केले उल्लंघन       घनकचरा योजना, पाणंद रस्त्याच्या कामात केलेले आर्थिक घोटाळ्यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करावी अशी गटविकास अधिकाऱ्याकडे केली मागणी- अशोक सोनवणे.  (बीड प्रतिनिधी ) बीड तालुक्यातील चौसाळा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री चव्हाण यांनी माहिती अधिकाराचे उल्लंघन केले असून मागितलेली माहिती देण्यास नकार दिला आहे. चौसाळा गावामध्ये घनकचरा योजना, पाणंद रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्याची चौकशी समिती स्थापन करून झालेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड यांच्याकडे केली आहे. सविस्तर माहिती अशी आहे की, चौसाळा ग्रामपंचायतीला गावाच्या विविध प्रकारच्या विकास करण्यासाठी शासनाकडून निधी मिळाला आहे. त्यामध्ये घनकचरा ही एक योजना आहे. गावांमध्ये सांडपाण्याचे खड्डे तयार करणे, ओला कचरा व सुका कचरा टाकण्यासाठी खड्डे खोदणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे, गाव रोगराईमुक्त करणे या आदी कामासाठी शासनाकडून सण स...

शेवगांव नगरपरिषदेत श्री निलेश फुलचंद रोकडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटनेते पदाचा राजीनामा त्यांच्या जागेवर घुले गटाचे कट्टर समर्थक पै. संतोष जाधव यांची नियुक्ती ?

Image
शेवगांव नगरपरिषदेत श्री निलेश फुलचंद रोकडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटनेते पदाचा राजीनामा त्यांच्या जागेवर घुले गटाचे कट्टर समर्थक पै. संतोष जाधव यांची नियुक्ती ? [ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 7219491445 दिनांक 24 सप्टेंबर 2026 वार गुरुवार ~ यां बाबत सविस्तर वृत्त असे की नगरपरिषद शेवगांव मध्ये पडद्याआड अनेक घडामोडी सुरु आहेत. त्यातीलच एक महत्वाची शेवगांव नगरपरिषदेत श्री निलेश फुलचंद रोकडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटनेते पदाचा राजीनामा त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे राजीनामा दिल्याचे त्यांनी मी शेवगांवकर च्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले त्यांच्या जागेवर डॉ क्षितिज घुले आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले गटाचे कट्टर समर्थक पै. संतोष जाधव यांची नियुक्ती झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कोणत्याही क्षणी हि घोषणा होऊ शकते. [ अरुण पाटील लांडे यांचा घुले पाटलांशी झालेला दुरावा त्यांची राजळे गटाशी वाढलेली सलगी आणि त्यांचे कट्टर समर्थ असलेले निलेश रोकडे यांची झालेली गोची यामुळे तर त्यांनी वैयक्तिक कारण देत राजीनामा तर दिला नाहि ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवजात आ...

राष्ट्रवादी भवन ते लेंडीनाला रस्ता खोदून नागरिकांना वेठीस धरल्याचा सरपतेचा आरोप

Image
राष्ट्रवादी भवन ते लेंडीनाला रस्ता खोदून नागरिकांना वेठीस धरल्याचा सरपतेचा आरोप बीड : राष्ट्रवादी भवन ते लेंडीनाला रस्ता मार्च २०२६ मध्ये मंजूर झाला असला तरी काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यालगत पाईपलाईनचे कामही मंजूर असून, पहिले पाईपलाईन आणि त्यानंतर रस्त्याचे काम करण्यात येईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले होते. मात्र संबंधित कंत्राटदाराने संपूर्ण रस्ता खोदून ठेवल्याने परिसरात पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. त्यामुळे शहंशाह नगर परिसरातील नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, नगरपरिषदेचे अभियंता श्री. माने यांनी पाईपलाईन कामाची वर्क ऑर्डर अद्याप दिलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद सरपते सातत्याने पाठपुरावा करत असूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नगरपरिषद प्रशासन, संबंधित कंत्राटदार आणि स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांना वेठीस धरू नये; पाईपलाईनची वर्क ऑर्डर तातडीने देऊन काम पूर्ण करावे आणि त्यानंत...

वंचित बहुजन आघाडीच्या बीड लोकसभा संघटकपदी ॲड. अरुण जाधव यांची निवड

Image
वंचित बहुजन आघाडीच्या बीड लोकसभा संघटकपदी ॲड. अरुण जाधव यांची निवड पक्ष संघटन मजबूत करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी; बूथपासून जिल्हास्तरापर्यंत संघटन बांधणीवर भर बीड प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष संघटना बांधणीला वेग देण्यासाठी राज्य कार्यकारी सदस्यांवर जिल्हानिहाय व लोकसभा क्षेत्रनिहाय जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत बीड लोकसभा क्षेत्राच्या संघटना बांधणीची महत्त्वपूर्ण जबाबदारी राज्य कार्यकारी सदस्य ॲड. अरुण जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे आणि प्रदेश सरचिटणीस प्रा. सोमनाथ साळुंके यांनी अधिकृत पत्राद्वारे नियुक्ती जाहीर केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा क्षेत्रात बूथ कमिट्या, ग्राम शाखा, सर्कल, तालुका आणि जिल्हास्तरावरील संघटन मजबूत करणे, सदस्य नोंदणी वाढविणे तसेच विविध आघाड्यांची प्रभावी यंत्रणा उभारणे, या दृष्टीने ॲड. अरुण जाधव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ॲड. अरुण जाधव हे वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावंत नेते म्हणून कार्यरत असून, जामखेड नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून...

सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात जुन्या डांबरी मटेरियल व दगड-गोट्यांचा वापर? सीताई कन्स्ट्रक्शनच्या कामाची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी-प्रा.सनी विष्णू वाघमारे

Image
सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात जुन्या डांबरी मटेरियल व दगड-गोट्यांचा वापर? सीताई कन्स्ट्रक्शनच्या कामाची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी-प्रा.सनी विष्णू वाघमारे बीड प्रतिनिधी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडियम ते राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान सदर रस्त्याच्या बेसच्या कामामध्ये दगड-गोटे तसेच जुन्या डांबरी रस्त्याचे मटेरियल/तुकडे वापरलेले दिसून आले. त्यामुळे हे साहित्य सदर कामाच्या मंजूर अंदाजपत्रक व तांत्रिक specifications नुसार आहे किंवा नाही, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणी बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडे लेखी तक्रार निवेदन देण्यात आले आहे. सदर कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता तसेच मंजूर Technical Specification नुसार काम होत आहे किंवा नाही, याची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. “सार्वजनिक नि...

महामानव अभिवादन ग्रुप तर्फे कंकालेश्वर विद्यालयात 116 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी

Image
महामानव अभिवादन ग्रुप तर्फे कंकालेश्वर विद्यालयात 116 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी   बीड (प्रतिनिधी ) आपल्य देशात हजारो वर्षा पुसन येथील समाज व्यवस्थेमुळे बहुसंख्य दीन, दलित, वंचित, बहुजन समज शिक्षणापासून दूर होता.शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे हे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, थोर समाज धोंडो केशव कर्वे,कर्मवीर भाऊराव पाटील,ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळख असणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखले होते कि शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्व घटकांकरिता शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातील अंधार नष्ट करण्याकरिता बहुमोल परिश्रम घेतले. त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करून " कमवा व शिका" स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, सर्वांचा विकास हेच आमचे ध्येय हा उदात्त हेतू ठेवून गोरगरीब वंचित बहुजन करिता प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणाचे रोपेट लावले व त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. लाखो विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ,डॉक्टर्स, वकील, प...

लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Image
लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड जिल्हास्तरीय स्पर्धेत तिन्ही मल्लांनी पटकावला प्रथम क्रमांक; विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा लिंबागणेश : (दि.२४) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विद्यालयातील शिवम दादासाहेब खिल्लारे, अवधूत मिनीनाथ जाधव आणि मल्हार विठ्ठल लेणे या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आपल्या-आपल्या वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी दिमाखदार निवड मिळवली. शिवम दादासाहेब खिल्लारे याने ६८ किलो वजन गटात, अवधूत मिनीनाथ जाधव याने ७१ किलो वजन गटात, तर मल्हार विठ्ठल लेणे याने ८० किलो वजन गटात दमदार कुस्तीचे प्रदर्शन करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशामुळे तिन्ही विद्यार्थ्यांची आगामी विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  ग्रामीण भागातील गुणवत्तेला मिळाले व्यासपीठ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही क्रीड...

नाखलगांव शालेय व्यवस्थापन समिती निवड जाहीर:

Image
नाखलगांव शालेय व्यवस्थापन समिती निवड जाहीर: अध्यक्षपदी इजास शेख, उपाध्यक्षपदी समाधान गायकवाड व अशोक अतकरे दिंद्रुड प्रतिनिधी : नाकलगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीची निवड उत्साहपूर्ण वातावरणात सर्वानुमते पार पडली. अध्यक्षपदी इजास शेख, तर उपाध्यक्षपदी समाधान गायकवाड व अशोक अतकरे यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी बळीराम जाधव, सोनाली सारंग पोटभरे, रुबीना रशिद पठाण, निर्मला सुरेश गायकवाड, रेखा दत्ता गवळी, आकाश राधाकिशन पाटोळे, सपना कृष्णा जाधव, नागनाथ किसन शेळके व सविता अतुल रत्नपारखे यांची निवड झाली. केंद्रप्रमुख नाईकवाडे सर, मुख्याध्यापक कुलकर्णी सर व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी पालक, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहापुरकर सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन जोगदंड सर यांनी केले.

बीड जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन ह्युमिडीफायरमधील गढूळ पाणी प्रकरणी चौकशीचे आदेश

Image
बीड जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन ह्युमिडीफायरमधील गढूळ पाणी प्रकरणी चौकशीचे आदेश उपसंचालकांकडून जिल्हा शल्यचिकित्सकांना चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे निर्देश “डॉ. संतोषकुमार सोळंके ठोस कारवाई करणार की दोषींची पाठराखण?” — डॉ. गणेश ढवळे बीड : (दि.२३ ) बीड जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारादरम्यानच्या कथित हलगर्जीपणामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयातील सेमी आयसीयू कक्षात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला सोनोग्राफीसाठी नेत असताना श्वास घेण्यास त्रास झाल्याने ऑक्सिजन मास्क लावण्यात आला. यावेळी रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या ह्युमिडीफायरमधील पाणी अत्यंत गढूळ, रंग बदललेले व गाळयुक्त असल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ह्युमिडीफायरमध्ये दूषित किंवा गढूळ पाणी वापरले जात असल्यास त्यातून सूक्ष्मजीवांची वाढ होण्याची शक्यता असून, निर्माण होणाऱ्या सूक्ष्म थेंबांमुळे श्वसनमार्गाच्या संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः आयसीयूतील गंभीर आजारी किंवा प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांसाठी ही बाब अधिक गंभीर ठरू श...

श्री.संत सावता माळी चौकातील हिंदू स्मशानभूमीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर

Image
श्री.संत सावता माळी चौकातील हिंदू स्मशानभूमीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर बिंदुसरा नदीपात्रासह स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमणाला नगरपरिषद प्रशासनाची मूक संमती  बीड : (दि. २२ ) बीड शहरातील मोंढा रोड परिसरातील श्री. संत सावता माळी महाराज चौकातील बिंदुसरा नदीपात्रालगत असलेली हिंदू स्मशानभूमी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून, वाढत्या अतिक्रमणामुळे स्मशानभूमीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिंदुसरा नदीपात्रासह स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमणाकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. स्मशानभूमी ही केवळ जागा नसून शेवटच्या निरोपाची साक्षीदार स्मशानभूमी ही केवळ जमीन नसून प्रत्येक कुटुंबाच्या शेवटच्या निरोपाची साक्षीदार असते. त्यामुळे तिचे संरक्षण ही शहराची सामूहिक जबाबदारी आहे. स्मशानभूमीच्या जागेची अधिकृत कागदपत्रे, हद्द व प्रत्यक्ष वस्तुस्थिती तपासून अतिक्रमण आढळल्यास नियमानुसार तत्काळ कारवाई करावी. तसेच स्मशानभूमीचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधि...

गणराय जिल्हा परिषदेत अवतरले! जिल्हा परिषद शाळांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काय झाले? जाब विचारण्यासाठी लक्ष्यवेधी आंदोलन; “गोरगरीबांच्या लेकरांना वाचवा, मूलभूत सुविधा पुरवा” — डॉ. गणेश ढवळे

Image
गणराय जिल्हा परिषदेत अवतरले!  जिल्हा परिषद शाळांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काय झाले? जाब विचारण्यासाठी लक्ष्यवेधी आंदोलन; “गोरगरीबांच्या लेकरांना वाचवा, मूलभूत सुविधा पुरवा” — डॉ. गणेश ढवळे बीड : (दि. २१) मान्सूनच्या आगमनापूर्वी राज्यातील सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले होते. १५ मेपूर्वी शाळांच्या इमारती, भेगा पडलेल्या भिंती, सैल झालेले प्लास्टर, कमकुवत छत, गळती होणारे छत, खिडक्या-दरवाजे, वर्गखोल्या, स्वयंपाकगृहातील गॅस जोडणी, धूर बाहेर काढण्याची व्यवस्था, इंधन साठवणूक, स्वच्छतागृहांसह २७ मुद्यांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या आदेशांची बीड जिल्ह्यात कितपत अंमलबजावणी झाली, याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी दि. २१ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालयात लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. केज तालुक्यातील लव्हुरी केंद्रांतर्गत तरनळी येथील सानप वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळल्याची घटना घडली. ही घटना रात्री घडल्याने सुदैवाने विद्यार्थ्यांची उपस्थिती नसल्यामुळे जीवितहानी टळली. या घटनेच्या पार्श्वभ...

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून गेलाय दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करा

Image
महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून गेलाय दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करा महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरून बाजीराव ढाकणे यांचा सरकारला सवाल; कर्नाटकच्या धर्तीवर तातडीच्या उपाययोजनांची मागणी बीड प्रतिनिधी : - राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात आली असून ग्रामीण भागात पाणी, चारा आणि शेतीच्या नुकसानीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन येत्या दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा महा एनजीओ फेडरेशनचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी केली. दुष्काळ जाहीर करण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करण्याची भूमिका शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे. पावसाचा खंड, पिकांची अवस्था, उपलब्ध पाणीसाठा, चारा व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती यांचा तातडीने आढावा घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटक सरकारने दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन काही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करत मदत व उपाययोजनांना...

लिंबागणेशमध्ये मयुरेश्वराचे राजेशाही थाटात विसर्जन

Image
लिंबागणेशमध्ये मयुरेश्वराचे राजेशाही थाटात विसर्जन  २२५ वर्षांची ‘एक गाव–एक गणपती’ परंपरा कायम; गौरीसोबत गणेशाचे विसर्जन, त्यामुळे पाच दिवसांचा गणेशोत्सव लिंबागणेश : (दि.१९ ) सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या बीड तालुक्यातील लिंबागणेश गावाची तब्बल २२५ वर्षांची ‘एक गाव–एक गणपती’ची परंपरा यंदाही कायम राहिली. सरकार वाड्यात प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या मयुरेश्वर गणेशाची शनिवारी (दि.१९) दुपारी एक वाजता मुख्य आरती झाल्यानंतर छत्री, चौरी, अब्दागिरी, चामर, ध्वज व दंड अशा राजेशाही लवाजम्यासह पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. सरकार वाड्यातून मिरवणूक बाहेर पडताच बँड पथक, टाळ-मृदंगाचा गजर आणि भजनी मंडळींच्या अभंग-गजराने वातावरण भक्तिमय झाले. ढोल-ताशांच्या निनादात लेझीम पथकातील तरुणांनी विविध कसरती सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. ‘मोरया हो मोरया’, ‘जय गजानन मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीत पंचक्रोशीतील १२ गावांमधील लेझीम पथकांनी सहभाग घेतला. रात्री नऊ वाजता श्री भालचंद्र गणपती मंदिरातील चंद्रपुष्करणी तीर्थावर महाआर...

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून बोरफडी येथे माजी सैनिक प्रकाश आबाराव वाघमारे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामाचे उद्घाटन

Image
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून बोरफडी येथे माजी सैनिक प्रकाश आबाराव वाघमारे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामाचे उद्घाटन  सरपंच कैलास घुगे यांच्या विकासकामांचे ग्रामस्थांकडून कौतुक बीड (प्रतिनिधी ) : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून बीड तालुक्यातील आदर्श गाव बोरफडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या दोन नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाचा शुभारंभ माजी सैनिक प्रकाश आबाराव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला. देशसेवेत योगदान दिलेल्या माजी सैनिकाच्या हस्ते शाळेच्या विकासकामाचा शुभारंभ करण्यात आल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बोरफडी गावात शिक्षणाच्या सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळेच्या नवीन दोन वर्गखोल्यांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पुरेशा व सुरक्षित वर्गखोल्या उपलब्ध व्हाव्यात, तसेच शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक चांगले व्हावे, या उद्देशाने हे काम करण्यात येत आहे. नवीन वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक जागेची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा मर...

तरनळीतील धोकादायक शाळेचे छत मध्यरात्री कोसळले

Image
"तरनळीतील धोकादायक शाळेचे छत मध्यरात्री कोसळले १०० अधिकाऱ्यांनी शाळाभेटींचा ‘इव्हेंट’ केला; पण धोकादायक शाळेकडे दुर्लक्ष!  शाळाप्रवेशाच्या पहिल्याच दिवशी प्लास्टर कोसळले, चार महिन्यांनी मध्यरात्री छत पूर्णपणे कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली — ‘लेकरं मेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?’ : डॉ. गणेश ढवळे बीड : (दि.१९) शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी जिल्हा प्रशासनातील सुमारे १०० अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मात्र, शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अद्याप गंभीर असल्याचे केज तालुक्यातील तरनळी येथील सानप वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुर्घटनेने पुन्हा समोर आणले आहे. दि.१५ जून रोजी शाळेच्या प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी छताचे प्लास्टर कोसळल्यानंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने दि.१८ सप्टेंबर रोजी रात्री हलक्या पावसादरम्यान शाळेचे छत पूर्णपणे कोसळले. मध्यरात्री दुर्घटना घडल्याने सुदैवाने विद्यार्थ्यांसह कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर...

आईची हौस, संस्कृती रक्षण की reels ची दुनिया? 'मजबुरी', 'कर्तव्य' आणि 'दिखावा' यातील नेमका फरक काय?

Image
आईची हौस, संस्कृती रक्षण की reels ची दुनिया? 'मजबुरी', 'कर्तव्य' आणि 'दिखावा' यातील नेमका फरक काय? [ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 7219491445 काल फेसबुकवर मी एका आईने ढोल-ताशांच्या गजरात लहान बाळाला कडेवर घेऊन ढोल वाजवतानाची पोस्ट केली होती.  त्या पोस्टला काही तासांत लाखो व्ह्यूज आणि हजारो प्रतिक्रिया आल्या. 95% लोकांनी बाळाच्या काळजीपोटी त्या आईच्या हलगर्जीपणाला दोष दिला, पण काहींनी चक्क माझ्या भूमिकेवर आक्षेपही नोंदवला. एका दादाने तर माझ्यावर पोलिस कारवाई करण्याची धमकीच दिली... मला त्यांचे संस्कृती रक्षण आणि उत्सवाचे म्हणणे पण एक वेळ मान्य पण असेल, पण तुम्ही या दुसर्‍या बाजूचा विचार नक्की केलाय का? दिखावा आणि मजबुरी यात खूप मोठा फरक असतो! सोबत दिलेल्या फोटोत तुम्ही पाहू शकता, 'कर्तव्य' आणि 'मजबुरी' खऱ्या अर्थाने कशाला म्हणतात.  आमच्या ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांना खरोखरच दुसरा कोणताही पर्याय नसतो. कामाच्या ठिकाणी पदराची झोळी करून पाठीला लेकरू बांधून त्यांना उन्हातान्हात शेतात काम करावे लागते. तुम्ही रोजगार हामी किंवा वीट भट्...

पाथर्डीत हॉटेल व्यावसायिक तरुणाचा दुर्दैवी अंत; इंदिरानगरमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

Image
पाथर्डी : शहरातील इंदिरानगर परिसरात हॉटेल व्यावसायिक गणेश आंतरकर या तरुणाचा मृतदेह आज दुपारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे. गणेश आंतरकर हे पाथर्डी शहरात हॉटेल व्यवसाय करत होते. त्यांच्या मृत्यूची माहिती समोर येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. तपासानंतरच या घटनेमागील कारण स्पष्ट होणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आंतरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकरी हंटर मैदानात

Image
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकरी हंटर मैदानात! राज्यांतील १९ जिल्ह्यांसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा;   जिरायतीला ₹२५ हजार, बागायतीला ₹५० हजार तर बहुवार्षिक पिकांना ₹७५ हजार हेक्टरी मदत द्या. शेतकरी हंटर सामाजिक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांना निवेदन बीड,  (प्रतिनिधी ) : पावसाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून, खरीप हंगामातील पिके संकटात सापडल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर आर्थिक संकटाचे ढग दाटले आहेत. पावसाअभावी बाधित १९ जिल्ह्यांसह मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना वाढीव हेक्टरी आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शेतकरी हंटर सामाजिक संघटना, महा, राज्य आक्रमकपणे पुढे सरसावली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहित (ऊर्फ) बाळासाहेब धुरंधरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस तसेच कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांना निवेदन देण्यात आले. पावसाचे असमान वितरण, पावसातील खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे अनेक भागांतील खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकऱ्...

आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात

Image
आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर रोजी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती...