सरकारच्या संवेदनाहीन धोरणाच्या निषेधार्थ धनगर समाज रस्त्यावर! लिंबागणेश येथे रास्ता रोको
लिंबागणेश (दि.२६): धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर दि.१६ मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दहाव्या दिवशी त्यांचे सासरे रामराव होळकर यांनी जालना येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
या घटनेनंतर धनगर समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सरकारकडून केवळ आश्वासने देऊन वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. मंत्रीमंडळातील शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली असली तरी ठोस निर्णय न घेतल्याने समाजात नाराजी वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारच्या संवेदनाहीन धोरणाच्या निषेधार्थ मराठा सेवक डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२६ गुरुवार रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाची सुरुवात स्व. रामराव होळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच त्यांचा बळी गेला असल्याची तीव्र भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी डॉ. गणेश ढवळे, रविंद्र निर्मळ, बाळासाहेब मोरे पाटील, बाळासाहेब मुळे, शहादेव धलपे, कृष्णा पितळे आदींची समयोचित भाषणे झाली. विद्यार्थी गणेश ढगारे यांनी मनोगत व्यक्त केले.वक्त्यांनी सरकारने कोर्ट-कचेरी व समित्यांच्या प्रक्रियेत न अडकता धनगर आणि धनगड हे एकच असल्याचा शासन निर्णय तातडीने घ्यावा, तसेच राज्यपालांच्या स्वाक्षरीसह शिफारस पत्र राष्ट्रपतींकडे पाठवून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी केली. निवेदन पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, विठ्ठल राठोड, गणेश परझने सहाय्यक फौजदार लिंबागणेश पोलिस चौकी, मंडळ अधिकारी पंडित नाईकवाडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव,राजेभाऊ आप्पा गिरे, शंकर वाणी, भगवान मोरे, गणपत तागड,बंकट लगास, भगवान मोरे, रामदास मुळे, गोवर्धन गिरे,ईश्वंभर मुळे, रोहित तागड, प्रविण मुळे, अर्जुन गिरे, रामकिसन गिरे, सुमंत मुळे,बंकट लगास, संदीप मुळे, बाबासाहेब गिरे, सतिश गिरे, केशव गिरे,श्रीराम तागड, आबा राहिंज, सुरेश निर्मळ, तुकाराम गायकवाड,गोरख मुळे, संजय पावले, रमेश गायकवाड, बापुराव पितळे,बंडु ढगारे, अमोल पितळे , हनुमंत वैद्य, अंकुश गिरे,लहु गिरे, लिंबाजी गिरे, श्रीहरी निर्मळ, परशुराम गायकवाड, अशोक जाधव,श्रीधर मुळीक,शहादेव कोल्हे,आप्पा मुळे, कल्याण कोकाटे, श्याम गिरे, सर्जेराव मुळे, रामचंद्र मुळे आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
Comments
Post a Comment