भव्य रथातून प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती मिरवणूक; बीडमध्ये उत्साहाचा जल्लोष

भव्य रथातून प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती मिरवणूक; बीडमध्ये उत्साहाचा जल्लोष


बौद्ध भिक्खू, समता सैनिक दल व बौद्ध बांधवांची मोठी उपस्थिती; सामाजिक ऐक्याचा संदेश
बीड (प्रतिनिधी):
चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात भव्य रथातून प्रतिमेची मिरवणूक काढून उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी करण्यात आली. बौद्ध धम्माचा प्रसार देशाबरोबरच परदेशातही करणारे प्रियदर्शी सम्राट अशोक यांची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून 26 मार्च रोजी देशभर जयंती साजरी केली जात आहे.

त्या निमित्ताने बीड शहरात सम्राट अशोक यांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. बौद्ध भिक्खू, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच बौद्ध उपासक-उपासिका यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचा भव्य रथ शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरविण्यात आला.

ही मिरवणूक राजुरी वेस, कारंजा टॉवर, बलभीम चौक, माळीवेस चौक मार्गे पुढे जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पोहोचली. येथे अभिवादन करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले आणि मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, भिक्खू संघ तसेच पूज्य भदंत डॉ. ए. सुमेध बोधी (राष्ट्रीय महासचिव), भंते सारिपुत्त (सातारा), भंते आनंद मेत्ता (अमरावती), भंते बुद्धघोष, भंते मोग्गलायन, भंते उपाली, भंते संघरक्षित (बीड) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच अमरसिंह ढाका (राज्य संरक्षण सचिव), जिल्हाध्यक्ष महालिंग निकाळजे, व्ही. एन. निसर्गन गुरुजी, कॅप्टन राजाभाऊ आठवले (मेजर जनरल, SSD), अरुणाताई निसर्गन, मंदाताई मस्के, जी. एम. भोले, चंद्रवदन जाधव, पी. व्ही.बनसोडे, अशोक ठोकळ, शिवाजी जाधव,गोपीनाथ बनसोडे, गौतम खेमाडे,अ‍ॅड.ओमप्रकाश गायकवाड, अ‍ॅड. हनुमंतराव कांबळे,एस.ए.शिंदे,ए. बी.जौंजाळ आदी उपस्थित होते.

बीड शहरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने सामाजिक ऐक्य व समतेचा प्रभावी संदेश दिला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी