मौजे निमगाव चोभा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. शंतनु महाराज गिरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार

मौजे निमगाव चोभा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. शंतनु महाराज गिरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार

  आष्टी तालुक्यातील भाविक-भक्त सर्व स्तरातील नागरिकांनी लाभ घ्यावा-- निमगाव चोभा सप्ताह कमिटी/ भजनी मंडळ /ग्रामस्थ
 आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : 
          आष्टी तालुक्यातील मौजे निमगाव चोभा येथे २० मार्च २०२६ ते २७ मार्च २०२६ या कालावधीमध्ये श्री भक्त दस्तवल भगवान पंढरीनाथाच्या कृपेने श्री रामचंद्र जन्मानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .   
       या कालावधीत ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे, ह.भ.प. प्रकाश महाराज जंजिरे , ह.भ.प. बंडोपंत महाराज ढाकणे, ह.भ.प. रवींद्र महाराज पोटे, ह.भ.प. गणेश महाराज शास्त्री, ह.भ.प. रामेश्वर महाराज भोजने यांचे या कालावधीत रात्री ९ ते ११ या वेळात कीर्तन झाले असून ह.भ. प. म्हातारदेव महाराज आठरे यांचे २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम जन्मस्तोव निमित्त सकाळी १०ते १२ या वेळात कीर्तन झाले असून २७ मार्च २०२६ शुक्रवार रोजी सकाळी १०ते १२ या वेळात ह.भ.प. शंतनु महाराज गिरी (पंढरपूर ) यांचे या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने व सौ पुष्पाताई रावसाहेब गाडे (माजी जिल्हा परिषद मुख्याध्यापिका ) यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने होणार आहे .
   तरी आष्टी तालुक्यातील सर्व स्तरातील भाविक भक्त /नागरिक /माता -भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन निमगाव चोभा येथील सप्ताह कमिटी /भजनी मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी