नाशिकच्या भोंदू बाबावर कारवाई करा; बीड जिल्हाधिकाऱ्यांना 'अंनिस'चे निवेदन

भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा-बुवाबाजी-सत्ता-संपत्तीच्या संगनमताने चालू असलेले 'महिलांचे शोषणा'विरोधी राज्यस्तरावर कठोर कारवाई व्हावी

         राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना 'मअंनिस' बीड शाखेचे निवेदन
बीड (दि 24):नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकर णाकडे केवळ त्या एका व्यक्तीच्या गुन्ह्याच्या रुपात पाहणे,ही मोठी चूक ठरेल.अंधश्रद्धा,सत्ता,संपत्ती,बुवाबाजी,ज्योतिष्य, व 'तथाकथीत अध्यात्म व दैवी शक्तीच्या' अतिशय धोकादायक संगनमताचे हे राज्याला हादरवून सोडणारे गंभीर उदा. आहे.करिता,या व अशा प्रकरणांची चौकशी केवळ आरोपीपुरती मर्यादित न ठेवता,त्या मागील संपुर्ण जाळ्याचा शोध घेण्याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,बीड शाखेच्या वतीने विवेक वाहिनीच्या राज्य कार्याध्यक्ष प्राचार्य सविता शेटे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मा.मुख्यमंत्री महोदयांना मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन पाठविले असल्याची माहिती जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्राचार्य कॉ डी जी तांदळे यांनी दिली आहे.
यासंबंधाने अधिक माहिती अशी की,समाजातील असुरक्षीतता,अशाश्वत जीवन,भिती,अंध श्रद्धा,व विविध समस्यांचा गैरफायदा घेत 'तथाकथीत फल ज्योतिष्य,अध्यात्म,दैवी शक्ती'च्या नावाखाली महिलांचे व जनतेचे भयंकर शोषण कसे केले जाते,याचे खरात प्रकरणामुळे चिंताजनक व संतापजनक चित्र पुन्हा समोर आले आहे. म्हणून,सदर प्रकरणाची निष्पक्ष,निर्भय,पारदर्शक चौकशी करून सर्व संबंधितांना कठोर शासन होईल,अशी हमी निर्माण व्हावी.
तद्वतच," महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम,2013" या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.आणि,या 'कायद्याअंतर्गत नियमावली' तयार करण्याचीअनेक वर्षापासून रखडलेली प्रक्रिया शासनाने गांभीर्याने पुर्ण करावी.राज्यघटनेने अधोरेखित केलेल्या 'वैज्ञानिक दृष्टिकोन' मुल्यासाठी शाळा- कॉलेजेस ,समाज-संस्थां मध्ये जनजागृती अभियान राबवावे.राजकिय पक्ष व नेत्यांचे अशा भोंदू बाबा-बुवा- बाया-मांत्रिक-ज्योतिषी यांचेशी असलेले संबंध तत्काळ तोडून विवेकी आचारसंहिता तयार करावी.फलज्योतिषी,अंकशात्र ,हस्तरेषातज्ञ यांचा जादूटोणा विरोधी कायद्यात समावेश करण्यात यावा.
अशोक खरातचे व त्यासारखे प्रकरणे राज्यभर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता,सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाला रितसर तपास करुन,गुन्हे नोंदविण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत. 
या व संबंधित मागण्यांचे निवेदन मा.मुख्यमंत्री महोदयांना बीडचे मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत पाठविले आहे.
निवेदनावर मअंनि समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे,विवेक वाहिनीच्या राज्य कार्यवाह प्राचार्य सविता शेटे, जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य कॉ डी जी तांदळे,बीड शाखेचे कार्या ध्यक्ष प्रा विजय घेवारे, प्रधान सचिव विधिज्ञ कॉ करुणा टाकसाळ ,युवा विभागाचे प्रतिक राऊत,सांस्कृतीक विभागाचे आदित्य विर,विधिज्ञ कॉ नितीन रांजवण,विधिज्ञ अनिता जोगदंड,विधिज्ञ मीरा डोईफोडे,लेक लाडकी 
अभियानचे समन्वयक बाजीराव ढाकणे, समता प्रतिष्ठानच्या शुभांगी कुलकर्णी,कौशल्या बावने,राणी कातखेडे,मातृभुमी प्रतिष्ठानचे डॉ संजय तांदळे,प्रवीण सोनवणे,शेर-ए-हिंद संस्थेचे शेख अमर पाशा,किरण घाडगे,एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे,तेजस्विनी भाटे, रनजित माने यांच्या 
स्वाक्ष-या आहेत.

.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी