पुणे येथे राज्यस्तरीय कर्तृत्व गौरव पुरस्काराने माया दिवाण यांचा सन्मान



पुणे/ बीड (प्रतिनिधी) – नालंदा फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘नालंदा कर्तृत्व गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये माया दिवाण यांना ‘कर्तृत्ववान महिला गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा सोहळा २१ मार्च २०२६ रोजी पत्रकार भवन, पुणे येथे उत्साहात पार पडला.

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालयात नोंदणीकृत असलेल्या नालंदा फाउंडेशनतर्फे राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा माया दिवाण यांच्या समाजाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

माया दिवाण यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत समाजासाठी दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिले आहे. लेखिका, कवयित्री, म्हणून त्यांची कार्य अधोरेखित आहे. समाजनिर्मितीसाठी त्यांनी अनेक वर्षे अविरत परिश्रम घेत प्रेरणा व सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. त्यांच्या लेखनातून व कवितेतून सामाजिक बांधिलकी, सृजनशीलता आणि समर्पण यांचे उत्कृष्ट दर्शन घडते.

या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून, समाजातील महिलांसाठी त्या प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन नालंदा फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. दिपक दादाराव जाधव (टॅलेंटकट्टा) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जागतिक महीला दिन 2026 चे औचित्य साधुन बीड येथे श्री. छत्रपती शाहु समाज प्रबोधन मडळ बीड तर्फे देखिल 8 मार्च 2026 रोजी "छत्रपती शाहु कर्तुत्ववानमहिला गौरव" पुरस्कारने त्यांचा सनमानीत केले होते.

दोन्ही पुरस्कारा बद्दल महामानव अभिनंदन ग्रुप, वाचल तर वाचाल फिरते मोफत वाचनालय, धम्मदिप बुद्धविहार महिला मंडळ. अँड.तेजस वडमारे, प्रा. डॉ.नामदेव शिनगारे, व मित्र परिवारने पुढील कार्यास शुभेच्छा देऊन मंगल कामना व्यक्त केल्या.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी