धम्मदीप बुद्ध विहार येथे प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती उत्साहात संपन्न

धम्मदीप बुद्ध विहार येथे प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती उत्साहात संपन्न

 माया दिवाण व बौद्धाचार्य भास्कर सोनवणे यांचा सत्कार 
बीड (प्रतिनिधी) युद्धात निपुण असलेल्या प्रियदर्शी सम्राट अशोकाने तलवारीच्या जोरावर जवळपास चक्रवर्ती सम्राट पद मिळवले होते. परंतु कलिंगा युद्धातील नरसंहार बघून त्यांनी तलवारीचा त्याग करून तथागतांच्या प्रज्ञा, शिल,करुणा मैत्री,समता, शांती व मानवाच्या कल्याणाचा पंचशील व अत:दीप भव आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला शरण जाऊन व तसे आचरण करून जगात लोककल्याणकारी सम्राट म्हणून कार्य केले. त्यांचा आदर्श समोर ठेवून जगाला युद्ध नको, तर बुद्ध विचारांची गरज आहे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ.नामदेव शिनगारे यांनी केले. महामानव अभिवादन ग्रुप व धम्मदीप बुद्ध विहार बलभीम नगर पालवण रोड बीड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीदिनी अभिवादन कार्यक्रमाच्याप्रसंगी अध्यक्षपदी प्रा. डॉ. नामदेव शिनगारे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून से.नि. शिक्षण अधिकारी सखाराम उजगरे,प्राध्यापक डॉ .शिवाजीराव दिवाण, से.नी उपनिबंधक सहकार ॲड हनुमंत कांबळे मुख्याध्यापक वैशाली शिंदे, बौद्धाचार्य ॲड भास्करराव सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. विचार मंचावर महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी. एम भोले, वाचाल तर वाचाल चे अध्यक्ष डी. जी वानखेडे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प तर सम्राट अशोक छत्रपती,शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पदीप धुपाने पूजन मान्यवरांच्या हस्ते करून विनम्र अभिवादन करण्यात आले व सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले कार्यक्रमाचे अवचित्य साधून सुप्रसिद्ध लेखिका, कवियत्री यांना नुकताच नालंदा फाउंडेशन पुणे तर्फे राज्यस्तरीय कर्तुत्व गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच बौद्धाचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल ॲड.भास्कर सोनवणे यांचा देखील महामानव अभिवादन ग्रुप व धम्मदीप बुद्ध विहारा तर्फे पुष्पगुच्छ व धम्मपद हा ग्रंथ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना माया दिवाण म्हणाल्या की सर्वच आदर्श महापुरुषांची जीवन चरित्रांचा सखोल अभ्यास करून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगल्यास आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो व पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करून ज्येष्ठांच्या कडून पाठीवरील कौतुकाची थाप पुढील कार्य करण्यास बळ देते व तथागतांच्या अंधारातून प्रकाशाकडे - प्रकाशाकडून अतिउच्च प्रकाशाकडे जाण्यास मदत होते असे भावोद्गार काढले.स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करून स्वतः सम्राट अशोकाने तथागताने सांगितलेल्या मानवाच्या कल्याणाच्या मार्गाचा प्रसार व प्रचार करण्याकरिता आपला पुत्र महेंद्र व कन्या संघमित्रा ला सिलोन (श्रीलंका)ला पाठवले हा सम्राट अशोकांचा त्याग सर्वांसाठी आदर्शवत आहे. कार्यक्रम प्रसंगी आयु.ॲड. हनुमंत कांबळे यांनी देखील सम्राट अशोकांच्या दैदिप्यमान जीवन पटावर सखोल प्रकाश टाकून सम्राट अशोकाचे कार्य सर्वांसमोर ठेवणे आजच्या काळात कसे गरजेचे आहे हे अनेक उदाहरणाद्वारे उपस्थितांना समजावून सांगून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी एम भोले यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. तेजस वडमारे यांनी केले कार्यक्रमास अंजली वडमारे, सरिता खेमाडे, अर्चना जाधव,आशाबाई भालेराव, क्रांती धनवे, मालणबाई अंकुटे रमाबाई सोनवणे, पी. वाय घोडेराव, बि.डी तांगडे, बी.जी दळवी,सुनील समुद्रे, दिलीप गवळी, व महामानव अभिवादन ग्रुपचे बहुसंख्य सदस्य व धम्मदीप महिला मंडळाच्या बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती. सरणात्तयने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी