भगव्या रंगात रंगणार पाटोदा; विराट हिंदू संमेलनाची पाटोद्यात जोरदार तयारी
पाटोदा (प्रतिनिधी )सकल हिंदू समाज,पाटोदा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पाटोदा शहर भगव्या रंगात न्हाऊन निघत असून वातावरणात धार्मिक उत्साहाची लाट उसळली आहे. येत्या गुरुवारी, दि. २६ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य संमेलनासाठी शहरात जोरदार तयारी सुरू असून सर्वत्र भगवे ध्वज आणि आकर्षक सजावट करण्यात येत आहे.श्रीराम मंदिर व काळा हनुमान मंदिर परिसरात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत होणाऱ्या या संमेलनात नामांकित शिवचरित्रकार अशोक बांगर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या विचारांतून हिंदू संस्कृती, इतिहास आणि एकतेचा संदेश दिला जाणार आहे.तसेच ह.भ.प. राधाताई महाराज आईसाहेब या मातृशक्ती प्रबोधन करणार असून समाजातील महिलांच्या सशक्त भूमिकेवर भाष्य करतील. ह.भ.प. लक्ष्मण महाराज सस्ते आणि ह.भ.प. केदारेश्वर महाराज जाधव हे प्रबोधनातून अध्यात्मिक व सामाजिक संदेश देणार आहेत.कार्यक्रमानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत काढण्यात येणारी भव्य मिरवणूक ही संमेलनाची मुख्य आकर्षण ठरणार आहे. ढोल-ताशांचा गजर,भगवे झेंडे,धार्मिक घोषणांनी पाटोदा शहर दणाणून जाणार आहे.या संमेलनाच्या माध्यमातून “हिंदू सारा एक” हा संदेश समाजात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात येत असून सामाजिक एकजूट आणि धार्मिक जागृती निर्माण करण्याचा आयोजकांचा उद्देश आहे.या भव्य सोहळ्यासाठी पाटोदा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment