शिवाजी महाराज चौक ते अशोक नगर रस्ते कामात तत्काळ सुधारणा करा-नवनाथअण्णा शिराळे पाटील यांचा इशारा
शिवाजी महाराज चौक ते अशोक नगर रस्ते कामात तत्काळ सुधारणा करा
नवनाथअण्णा शिराळे पाटील यांचा इशारा
बीड प्रतिनिधी: बीड शहरातील मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अशोक नगर दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी सभापती नवनाथअण्णा शिराळे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासनाने संबंधित गुत्तेदाराला कडक आदेश देऊन हे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेण्याची मागणी त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या मुख्य रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने हे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे आवश्यक आहे.
रस्त्यावर केवळ माती टाकून 'बोगस' काम केले जात असल्याचा आरोप शिराळे पाटील यांनी केला आहे. मातीऐवजी चांगल्या प्रतीचा मुरूम वापरून, त्यावर पाणी मारून बुलडोझरने योग्य पद्धतीने दबाई करण्यात यावी, जेणेकरून रस्ता मजबूत होईल.
जुन्या नियोजित सिमेंट रोडची कामेही रखडली असून ती तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे. कुठेही भ्रष्ट कारभार किंवा निकृष्ट दर्जाचे काम होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
"येणाऱ्या मे-जून महिन्यात पावसाळा सुरू होईल. त्यापूर्वी हा रस्ता पूर्ण न झाल्यास नागरिकांचे हाल होतील. प्रशासनाने गुत्तेदाराला पाठीशी न घालता कडक सूचना द्याव्यात आणि रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा."
— नवनाथअण्णा शिराळे पाटील (भाजपा नेते
Comments
Post a Comment