आंदोलनकर्त्यांच्या निवारा शेड, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष; जिल्हा प्रशासनाला ‘तिरडी भेट

आंदोलनकर्त्यांच्या निवारा शेड, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष; जिल्हा प्रशासनाला ‘तिरडी भेट’

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन : डॉ. गणेश ढवळे
बीड (दि. ३०) : बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्रामविकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मात्र याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष)बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले( जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे( जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद ( शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे ( बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ ( अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था),बबिता शिंदे ( जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले ( रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके , भिमराव पायाळ 
आदी सहभागी झाले होते.



मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.




मूलभूत सुविधांची तातडीची गरज

नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्यामुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


स्वच्छतागृहांचे पुनर्बांधकाम करावे

बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्यामुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी