पाटोदा महावितरणचा बेजबाबदार कारभार; रात्री लाईट गायब,अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन बंद गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास संपर्क कोणाशी साधायचा मोठा प्रश्न

पाटोदा महावितरणचा बेजबाबदार कारभार; रात्री लाईट गायब,अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन बंद गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास संपर्क कोणाशी साधायचा मोठा प्रश्न

पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा शहरात महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.शहरातील बस स्टँड परिसरात काल रात्री वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. वारंवार प्रयत्न करूनही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याशी संपर्क साधता आला नाही, कारण त्यांचे फोन बंद असल्याचे निदर्शनास आले.आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नेमके कोणाकडे धाव घ्यावी, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. महावितरणकडून कोणतीही तातडीची मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करत, वीजपुरवठा सुरळीत ठेवावा तसेच रात्रीच्या वेळीही अधिकारी व कर्मचारी संपर्कात राहावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी