पाटोदयात विद्यार्थिनी व पालकांसाठी भव्य आरोग्य जनजागृती मेळावा; गर्भाशय कॅन्सर जनजागृतीनंतर HPV लसीकरणाला सुरुवात



पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा शहरात 
दिनांक 30/ 03/ 2026 रोजी पाटोदा शहरातील प्रियदर्शिनी माध्यमिक कन्या शाळा व वसंतराव माध्यमिक शाळा येथे विद्यार्थिनी व पालकांसाठी भव्य आरोग्य जनजागृती व समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात आठवी ते नववीच्या वर्गातील मुलींसह त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.हा कार्यक्रम डॉ.नरेशजी कासट THO पाटोदा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सखोल माहिती देण्यात आली. विशेषतः वय वर्ष 14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी HPV लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.
समुपदेशक चव्हाण यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले व आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.या कार्यक्रमात TNO दराडे मॅडम यांची उपस्थिती विशेष ठरली. दराडे मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच पालकांनाही आपल्या मुलींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित आशा वर्कर यांनीही शासकीय आरोग्य योजनांची माहिती देत लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमानंतर तत्काळ विद्यार्थिनींसाठी HPV लसीकरण मोहीम राबविण्यात आली. पात्र मुलींना प्रत्यक्ष लस देण्यात आली असून या उपक्रमामुळे जनजागृतीसोबतच प्रत्यक्ष कृतीही झाल्याने कार्यक्रमाला अधिक परिणामकारक स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी पालक मेळाव्यात पालकांशी संवाद साधण्यात आला. पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा आरोग्यविषयक उपक्रमांची गरज व्यक्त केली. या उपक्रमामुळे पाटोदा शहरात आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थिनी व पालकांमध्ये HPV लसीकरणाबाबत जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी