एकता मराठी संमेलनात कथाकथन रंगले.महिला रसिकांनी लुटला मनमुराद आनंद

एकता मराठी संमेलनात कथाकथन रंगले.महिला रसिकांनी लुटला मनमुराद आनंद
सातारा प्रतिनिधी : एकता फाउंडेशन, म.सा.प.शिरूर कासार आणि पाडळीकर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील पाडळी ता.शिरूर कासार येथे दोन दिवशीय राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दि.२४ मार्च रोजी नेत्रदीपक ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात झाली. तद्नंतर माजी आमदार ॲड.मा.उषाताई दराडे यांच्या अध्यक्षतेखालील संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डाॅ.तात्याराव लहाने यांनी केले. द्वितीय सत्रात 'लेखक आपल्या भेटीला' आणि राज्यस्तरीय निमंत्रितांचे कविसंमेलन (भाग एक) पार पडले. रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.
         दि.२५ रोजी सकाळी १० वाजता कथाकथन सत्राने संमेलनाच्या दुसर्‍या दिवसाची सुरूवात झाली. कथाकार रंजना सानप (मायणी जि.सातारा) यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमात कडा ता.आष्टी जि.बीड चे जेष्ठ कथाकार वि.भा.साळुंके यांनी 'अशी गस्त झाली मस्त' ही विनोदी कथा सादर करून उपस्थितांना खळखळून हसवले. यानंतर श्रुती काळे-सोनटक्के (रायमोह जि.बीड) यांनी व्यसनमुक्ती या विषयावरील 'व्यसनाचा विळखा' कथा सादर करून रसिकांसमोर व्यसनाधीनतेचे दाहक परिणाम विषद केले. एकता फाउंडेशन मराठवाडा विभागीय सचिव अंबादास केदार (उदगीर जि.लातूर) यांनी 'सालगडी' ही बाणेदार सालगड्याची कथा पेश करत उपस्थितांमध्ये स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवले. शेवटी कथाकथन सत्राच्या अध्यक्षा श्रीम.रंजना सानप यांनी 'पत्र' ही अशिक्षित कामगार महिलेची आणि तिला निस्वार्थ भावनेने शिकवणाऱ्या हळव्या मनाच्या अधिकाऱ्याची आणि त्यांच्यात निर्माण झालेल्या माय लेकाच्या नात्याची भावविभोर कथा सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
         यावेळी संमेलनाध्यक्षा मा.आमदार ॲड.उषाताई दराडे, एकता फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, सल्लागार ॲड.भाग्यश्री ढाकणे, महिला आघाडीच्या प्रमुख रंजना फुंदे, प्रवक्ता मल्हारी खेडकर, शिवचरित्रकार कैलास तुपे, संस्थापक सदस्य राजेश बीडकर, नितीन कैतके, व्यंगचित्रकार सुहास पालिमकर, दिपक महाले, माही शेख, लता बडे-कराड, डाॅ.बाळासाहेब सानप, डाॅ.स्नेहल सानप-कराड, पाडळीचे माजी सरपंच रामदास(दादा) हंगे, सरपंच गहिनीनाथ पाखरे, मनिषा पाटील, एकता फाउंडेशनचे प्रदेश संघटक देविदास शिंदे, जगदीश चेमटे, रामदास केदार (उदगीर), रसूल पठाण (उदगीर), विठ्ठल कंठाळे, मनिषा कंठाळे, अनिता पाखरे, सत्यभामा कंठाळे, अलका गिते, सुभाष कंठाळे, राजेंद्र कंठाळे, मनिषा हंगे यांच्यासह गावातील रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी