भक्तीच्या जनसागरात निमगाव गडाचा ४८ वा नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न
भक्तीच्या जनसागरात निमगाव गडाचा ४८ वा नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न
सोपान मोरे यांचा मीडसांगवी ग्रामस्थांकडून सत्कार
आष्टी (प्रतिनिधी --गोरख मोरे) :
अहिल्या नगर जिल्ह्यातील मीडसांगवी येथे श्री क्षेत्र निमगाव गडाच्या ४८ व्या नारळी सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सोहळ्यानिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनासाठी बीड/अहिल्या नगर जिल्ह्यातील भाविकांचा अथांग जनसागर लोटला . या प्रसंगी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिरूर कासार तालुकाप्रमुख सोपान ( काका) मोरे यांनी आवर्जून उपस्थिती लावून कीर्तनाचा लाभ घेतला.
या प्रसंगी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना कीर्तनकार महाराजांनी आपल्या रसाळ वाणीतून समाजाला मोलाचा संदेश दिला. सत्याची कास धरून मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. सप्ताहाच्या सांगता समारंभात उपस्थित मान्यवरांचा शाल /श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला . या मध्ये शिरूर कासार तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने सोपान (काका) मोरे यांचा मीडसांगवी ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार केला . या सन्मानाबद्दल सोपान (काका ) मोरे यांनी समस्त ग्रामस्थांचे आभार मानले.
विविध कार्यक्रमांना लावली उपस्थिती--
नारळी सप्ताहाच्या सोहळ्यासोबतच सोपान(काका ) मोरे यांनी परिसरातील सामाजिक /धार्मिक कार्यक्रमांनाही भेटी दिल्या असुन राक्षसभुवन येथे आयोजित दशक्रिया विधीस उपस्थित राहून त्यांनी शोककुल परिवाराचे सांत्वन केले. तसेच जाटनांदूर-मुळकवाडी येथे पार पडलेल्या वर्षश्राद्ध कार्यक्रमासही त्यांनी उपस्थिती दर्शवून अभिवादन केले.
या संपूर्ण दौऱ्यात सोपान(काका ) मोरे यांनी ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधला. मीडसांगवी येथील सप्ताहाचे नियोजन आणि भाविकांची शिस्त पाहून त्यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले .
Comments
Post a Comment