वीर यांच्या "संगर" निवासस्थानी भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघाचे उत्स्फूर्त स्वागत



 बीड प्रतिनिधी - एकतानगर नाळवंडी नाका परिसरातील “संगर” या निवासस्थानी चैत्यभूमी, मुंबई येथील भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघ यांचे वीर परिवाराच्या वतीने अत्यंत उत्साहात स्वागत, सत्कार व भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कालकथित नारायण वीर शिकवलेल्या धम्माच्या मार्गावर मार्गक्रमण करत वीर परिवार ने आज धम्म सेवा केली आहे.

धम्मरथाद्वारे चैत्यभूमी येथून आगमन झालेल्या भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघाचे आगमन होताच परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले. यावेळी अॅड.चंद्रवणी वीर तसेच समाजसेवक पुरुषोत्तम उर्फ (गोटु) वीर यांनी सहकुटुंब उपस्थित राहून भंन्ते व संघाची आदरपूर्वक सेवा केली.
वीर परिवाराने अत्यंत श्रद्धा व समर्पण भावनेने भिक्खू संघाचे स्वागत करत पारंपरिक पद्धतीने सत्कार केला. तसेच सर्व भिक्खूंना सन्मानपूर्वक भोजनदान देण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी धम्माच्या मार्गावर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमात शांतता, करुणा व बंधुभाव यांचा सुंदर संदेश देत भंन्ते डॉ. सुमेधबोधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाली.

हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुंदर, शिस्तबद्ध व धम्ममय भावाने पार पडला असून परिसरात याची विशेष चर्चा रंगली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी