चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती 26 मार्च दिनी बीडमध्ये होणार साजरी - कॅप्टन राजाभाऊ आठवले



बीड (प्रतिनिधी): चक्रवर्ती सम्राट अशोक जयंतीनिमित्त बीड शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवार दि. २६ मार्च रोजी हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळी ठीक ९.०० वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयात सम्राट अशोकांच्या आदर्शांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यावेळी त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात येणार आहे.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भिक्खुसंघाच्या उपस्थितीत भव्य धम्मरथातून सम्राट अशोकांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक राजुरी वेस, कारांजा, बलभीम चौक, टिळक रोड, माळीवेस मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाणार असून, त्या ठिकाणी सम्राट अशोकांना मानवंदना देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच सम्राट अशोका शाक्य संघ (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी) यांचे सदस्य गणवेशात सहभागी होणार आहेत. तसेच भारतीय धम्म महासंघ व मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका पांढऱ्या शुभ्र वेशात उपस्थित राहणार आहेत.

समता सैनिक दलाचे कॅप्टन राजाभाऊ आठवले (मेजर जनरल, SSD) यांनी सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून जयंती सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी