धानोरा येथे २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन

धानोरा येथे २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन

  भागवताचार्य ह. भ. प. अशोक महाराज भोसले यांच्या कीर्तनाचे आयोजन

  धानोरा परिसरातील सर्व स्तरातील नागरिक/ माता- भगिनी /युवक वर्गाने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा-- धानोरा ग्रामस्थ
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : 
          आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे दिनांक २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी हनुमान जन्मोस्तवाचे आयोजन करण्यात आले .
    या मध्ये पहाटे ४ ते ६ काकड मिरवणूक , सकाळी ६:२० वाजता श्री हनुमान जलाअभिषेक व महापूजा, सकाळी ७:३० ते १० या वेळात संत नामदेव महाराज गुरुकुल पारगाव जो संस्थान यांच्या बाल वारकऱ्यासहित भव्यरथ मिरवणूक होऊन त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळात भागवतचार्य ह. भ. प. अशोक महाराज भोसले यांचे जाहीर कीर्तन होणार आहे . व त्यानंतर महाप्रसादाची पंगत ठेवण्यात आली आहे . या महाप्रसाद पंगतीचे अन्नदाते ओमकार शिंगटे , सौरभ शेंदुरकर , सोपनील तरटे आणि ऋषिकेश मोरे यांच्या मार्फत असून धानोरासह परिसरातील सर्व स्तरातील नागरिक /माता- भगिनी /युवक वर्गाने धानोरा येथील हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन धानोरा ग्रामस्थांनी केले आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी