लऊळ येथील स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक
लऊळ येथील स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक ,
ग्रामसभेमध्ये गावच्या विविध विकास कामासंदर्भात जनतेने विचारले सरपंचांना प्रश्न,
ग्रामपंचायत विभाजन करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू , सरपंच लक्ष्मण सरवदे
वडवणी बीड प्रतिनिधी, अंकुश गवळी
वडवणी तालुक्यातील लवुळ गावामध्ये या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, लवुळ नं, एक, व लवुळ नं दोन असे दोन गावची या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत आहे, या ठिकाणी ग्रामपंचायत स्वतंत्र विभाजन ग्रामपंचायत करण्यात यावी यासाठी, ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश केला, व ठराव देण्यात यावा यासाठी ग्रामसभा तहखुब करण्यात आली होती,या वेळी ग्रामपंचायत विभाजन करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू असा विश्वास सरपंच लक्ष्मण सरवदे यांनी केला आहे, ग्रामपंचायत विभाजन करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आम्ही सहकार्य करू गावच्या विविध विकास संदर्भात ग्रामस्थांनी सरपंचाकडे ग्रामसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रस्ताव टाकले , गावामध्ये विविध विकास कामे झाले आहेत त्याची विभागीय चौकशी लावण्यात यावी, यासाठी ग्रामस्थांनी निवेदन दिले, सरपंचांनी गावातील ग्रामस्थांना आपल्या कार्यकाळात सर्व ग्रामस्थांना शासकीय योजनेचा लाभ देण्याचे आव्हान या ठिकाणी त्यांनी केलं, यावेळी गावातील काही युवकांनी सरपंचांना आपल्या मागण्या व विविध विकास कामासंदर्भात निवेदन दिले यावेळी प्रमुख मागणी, प्रमुख मागणे : १ :पंतप्रधान आवास प्लस २०२४ योजना ड्रॉप यादी मधील नवीन नावाचा समावेश करण्यात
२ : जलजीवन कामाची चौकशी करणेबाबत ८९ लाख रुपयांचे योजना बंद पडली अर्धवट सोडून याची चौकशी संबंधित दोषीवर कारवाई करा ,
३ : शेत पोच रस्त्यावर खडीकरण करणे बाबत
४ : गावातील मुख्य चौकात सि.सि.टी. कॅमेरा लावने बाबत
५ : जिल्हा परिषद शाळा चा बोगस निधी उचलण्याबाबत
६ : मागील पाच वर्षांत ग्रामपंचायत मधील कामाचा बोगस कामाची विभागीय चौकशी लावण्याबाबत व संबंधित व्यक्तीवर फौजदारी करणे बाबत , व गावच्या विविध विकास कामसंदर्भात व झालेल्या बोगस काम संदर्भात यासाठी ग्रामस्थांनी लेखी मागण्या द्वारे निवेदन दिले यावेळी या ग्रामसभेला ग्रामस्थ महिला ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, यावेळी लक्ष्मण सरवदे यांनी म्हटले आहे की आम्ही गावच्या विकासासाठी कटिबद्ध आमच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत यावेळी गावातील प्रत्येक जनतेपर्यंत शासकीय योजनेचा लाभ यावेळी प्रत्येकांना लाभ मिळवून देणे असल्याचे यांनी म्हटल आहे ग्रामसभा झाल्यानंतर लवूळ ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच लक्ष्मण सरवदे यांनी गावातील विविध वार्डामध्ये जाऊन पाहणी केली, तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,
Comments
Post a Comment