निर्भीड पत्रकार संघाच्या बीड तालुका अध्यक्षपदी शेख फहीम सलीम यांची निवड

निर्भीड पत्रकार संघाच्या बीड तालुका अध्यक्षपदी शेख फहीम सलीम यांची निवड
बीड प्रतिनिधी

निर्भीड पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, पत्रकारांच्या न्याय हत्कासाठी लढणारी निर्भीड संघटना असून संघटनेच्या बीड तालुका अध्यक्षपदी शेख फहीम सलीम यांची निवड संस्थापक अध्यक्ष रुचिता मलवारी, यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष देवेंद्र सिंग ढाका यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सोळंके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

सां. दैनिक सिटीजनचे शहर प्रतिनिधी शेख फहीम सलीम यांचे पत्रकारितेतील योगदान पाहता बीड अध्यक्षपदी पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आवाज उठवणे, व संघटना बांधणीसाठी योगदान देत निर्भीड पत्रकार संघ मजबूत करणे हाच प्रमुख उद्देश आपल्यासमोर असल्याचे यावेळी शेख यांनी म्हटले.

या निवडीच्या वेळी वरील मान्यवरांसह जिल्हाातील तथा राज्यातील पदाधिकारी यांनी शेख यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या निवडीमुळे बीड तालुक्यातील पत्रकारितेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

उपस्थित मान्यवर

प्रदेशाध्यक्ष देवेंद्र सिंग ढाका

जिल्हाध्यक्ष परमेश्वर सोळंके

माजलगाव तालुका अध्यक्ष तथा संपादक बाळासाहेब आडगळे

संपादक मिलिंद आदमाने

संपादक उत्तम ओव्हाळ

जिल्हा सचिव आनंद वीर

महिला जिल्हाध्यक्ष किरण डोळस

युती महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी